आपण ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असाल, तर हे आपल्याला नक्कीच माहित असेल की, आपल्या प्रत्येक हालचालींवर ग्रह, ताऱ्यांचा प्रभाव असतो. अशातच येत्या 23 जुलै रोजी शुक्र ग्रह वक्र स्थितीत येणार आहे. याचा राशींवर परिणाम होणार आहे. देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुदगल यांनी शुक्राच्या या वक्र चालीचा कोणत्या 7 राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल, हे सांगितलं आहे.
43 दिवस वक्र चाल चालणाऱ्या शुक्राचा मेष, कन्या, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. म्हणजे नेमकं काय होईल आणि त्यावर उपाय काय करावा पाहूया.
मेष : आपल्या वडिलांची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे त्यांची काळजी घावी. शिवाय कौटुंबिक वादही उद्भवेल. तुमचा प्रवासही होऊ शकतो. नोकरीतही जपून काम करावं. उपाय : मारुतीची पूजा करावी.
कन्या : आपल्याला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनावश्यक खर्चांपासून दूर राहा. गुंतवणूकही काळजीपूर्वक करा. जास्त काम आणि कमी आराम, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. उपाय : शनिवारी हनुमान चालीसेचं पठण करावं.
वृश्चिक : आपण आईची काळजी घ्यावी, तिची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. शिवाय आपण स्वतःचीदेखील काळजी घ्यावी. याकाळात आपल्या अनावश्यक खर्च करावा लागू शकतो. बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. एकूणच खर्च वाढेल. उपाय : हनुमान चालीसेचं पठण करावं.
धनु : आपण जे काही काम कराल, ते अत्यंत विचारपूर्वक करावं. कारण आपला ताण वाढणार आहे. त्यामुळे आपल्या कार्यात अडथळे येऊ शकतात. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करण्यास अडचण निर्माण होईल. उपाय : गणपती आणि देवी सरस्वतीची पूजा करावी.
मकर : आपल्याला या काळात शारीरिक कष्टाची कामं करावी लागतील. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, अन्यथा आपल्याला रुग्णालयात जावं लागेल. तसेच व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतूनही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या काळात मोठी गुंतवणूक करू नका. उपाय : सोमवारी महादेवांना बेलपत्र अर्पण करावं.
कुंभ : आपल्या कौटुंबिक व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कुटुंबात भांडण उद्भवू शकतं. याकाळात कोणत्याही प्रकारचं कर्ज घेऊ नये. नोकरीत आपल्या वरिष्ठांशी वाद घालू नका. त्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उपाय : महादेवांची पूजा करावी.
मीन : याकाळात आपण वाहनांपासून शक्य तितकं दूर राहावं. वाहन चालवतच असाल तर सावधगिरी पाळावी. आपल्या कुंडलीत दुर्घटना योग आहे. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रणात असावा. उपाय : महादेवांना अभिषेक करावा. महामृत्यूंजय जप करावा.