JOIN US
मराठी बातम्या / Viral / याला म्हणतात नशीब! फुटपाथवर फिरत असताना सहज घेतलं लॉटरीचं तिकीट; दुसऱ्या दिवशी भाऊ झाला ना करोडपती!

याला म्हणतात नशीब! फुटपाथवर फिरत असताना सहज घेतलं लॉटरीचं तिकीट; दुसऱ्या दिवशी भाऊ झाला ना करोडपती!

काही काही लोक तर आपल्याला कधीतरी 1 लाखाची लॉटरी लागेल, अशा भाबड्या आशेने लॉटरीचं तिकीट विकत घेतात.

जाहिरात

लॉटरीने या पठ्ठ्याचं नशीबच पालटलं आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गौरव सिंह, प्रतिनिधी भोजपूर, 27 जून : आपल्याला कधी एक कोटी रुपये मिळाले, तर आपण त्याचं काय करू? असा हलकासा विचार कधी कधी मनात येऊन जातो. काही काही लोक तर आपल्याला कधीतरी 1 लाखाची लॉटरी लागेल, अशा भाबड्या आशेने लॉटरीचं तिकीट विकत घेतात. अनेकांना हे तिकीट विकत घेण्याचं जणू व्यसनच असतं. परंतु बिहारच्या एका पठ्ठ्याचं नशीबच लॉटरीने पालटलं आहे. त्याला चक्क 1 कोटीची लॉटरी लागली. राहुल केसरी हा बिहारच्या आरा भागातील तरुण कोलकातामध्ये फिरायला गेला होता. फिरता फिरता फुटपाथवरून त्याने एक लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. या तिकिटावर 82D16928 हा क्रमांक होता. नेमकी याच क्रमांकाची निवड झाली आणि राहुलला 1 कोटीची लॉटरी लागली.

गव्हर्नमेंट ऑफ नागालँड डायरेक्टरेट ऑफ राज्य लॉटरीज नागालँड कोहिमा या कंपनीकडून ही लॉटरी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे आता राहुलला त्याचे कागदपत्र घेऊन कोहिमाला बोलवण्यात आलं आहे. कागदपत्र दिल्यानंतर करकपात होऊन त्याला 65 लाख रुपये मिळतील. Video : लग्नात दिरानं वहिनीला दिलं असं गिफ्ट की नवरदेवाने भरस्टेजवरच उचलला हात दरम्यान, या लॉटरीची सध्या संपूर्ण बिहारमध्ये चर्चा आहे. शिवाय राहुलचे कुटुंबीय प्रचंड आनंदात आहेत. राहुलला इतक्या पैशांचं काय करणार असं विचारलं असता, ते पैसे मिळाल्यावरच ठरवता येईल, असं तो म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या