JOIN US
मराठी बातम्या / Viral / झाडाच्या फांदीला लटकून घेत होता झोका; अचानक तरुणासोबत असं काही घडलं की मित्रांनाही हसू आवरेना..VIDEO

झाडाच्या फांदीला लटकून घेत होता झोका; अचानक तरुणासोबत असं काही घडलं की मित्रांनाही हसू आवरेना..VIDEO

या व्हिडिओमध्ये मुलांचा एक ग्रुप झाडाच्या फांदीला लटकण्याचा खेळ खेळत आहे. या गटात 6 मुलांचा समावेश होता, जे झाडाची भली मोठी फांदी धरून याला लटकत झुला घेत होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 17 मार्च : मैत्रीचं नातं हे जगातलं एक सुंदर नातं आहे. हे असं नातं आहे की जे आपल्याला फक्त दुःखात साथ देत नाही तर आपल्या जीवनात आनंद भरण्याचं काम करतं. मित्र एकमेकांसोबत अशा प्रकारची मस्करी करत असतात, जी इतर कोणी ऐकूनही शकत नाही. मात्र मुलांमध्ये एक गोष्ट आहे की ते आपल्या मित्रांवर जितकं जास्त प्रेम करतात तितकंच ते त्यांचे पाय खेचण्यातही पुढे राहतात. आजकाल मुलांच्या मैत्रीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. चिंपांझीला डिवचणं पडलं महागात; प्राण्याने हात-पाय ओढत तरुणाची केली भयानक अवस्था..VIDEO या व्हिडिओमध्ये मुलांचा एक ग्रुप झाडाच्या फांदीला लटकण्याचा खेळ खेळत आहे. या गटात 6 मुलांचा समावेश होता, जे झाडाची भली मोठी फांदी धरून याला लटकत झुला घेत होते. सर्व मुलं आधी फांदी खाली खेचतात आणि नंतर फांदीसोबत वर जाऊन झोका घेताना दिसतात. हे करत असताना अचानक यातील पाच जणांनी झाडाची फांदी सोडली.. मात्र, एक मुलगा फांदीवर लटकत राहिला, अशात वजन अचानक कमी झाल्याने ही फांदी या मुलासह अतिशय वरती गेल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या

सुदैवाने झाडाची फांदी जितक्या वेगाने वर गेली तितक्याच वेगाने खाली आली. झाडाची फांदी खाली येताच तो तरुण फांदी सोडून जमिनीवर पडला. ही घटना पाहून आजूबाजूला उपस्थित असलेले मित्र आणि काही लोक मोठ्याने हसले. ते मोकळेपणाने हसू लागले. व्हिडिओ पाहून तरुणाला मार लागला असल्याचं समजतं.

हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम यूजरने शेअर केला आहे. यावर आतापर्यंत सुमारे 19 लाख लाईक्स आले आहेत. तर 3 कोटी 18 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओवर 4 हजारांहून अधिक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं की “एका सेकंदात स्वर्गात गेला आणि फिरून परत आला”. तर काहींनी “लहानपणीचे दिवस आठवले” असं लिहिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या