पाय घसरून धबधब्यात पडला
बंगळुरू 25 जुलै : आजकाल लोकांमध्ये रील्स बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे. अनेकदा तर यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यासही मागे-पुढे पाहात नाहीत. याच कारणामुळे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये रील बनवताना मोठा अपघात झाला. मात्र तरीही लोक हे सगळं करणं सोडत नाहीत आणि निष्काळजीपणा करतात. सध्या सोशल मीडियावर असाच आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कर्नाटकातील कोल्लूरजवळील अरसीनागुंडी धबधब्याचा आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रील बनवताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. हा व्यक्ती धबधब्यामध्ये असलेल्या एका दगडावर उभा राहिला होता. तर पाठीमागे असलेली व्यक्ती त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. त्याच दरम्यान त्याच्यासोबत अपघात झाला. रविवारी शिवमोग्गा येथील कोल्लूरजवळील अरसीनागुंडी धबधब्यावर इंस्टाग्राम रील बनवताना एका तरुणाचा अपघात झाला. हा तरुण धबधब्यात असलेल्या दगडांवर उभे राहून व्हिडिओ शूट करत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो वेगाने वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही. बचाव पथक तरुणाच्या शोधात गुंतलं आहे. याप्रकरणी कोल्लूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाचे कुटुंबीयही कोल्लूरला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने कर्नाटकातील विविध भागात खराब हवामाना असल्याची माहिती दिली आहे. एका किड्यानं खराब केलं संपूर्ण आयुष्य, 52 लाख खर्च करुनही कापावे लागले हात-पाय IMD ने कर्नाटकातील अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकातील अनेक धबधब्यांची पाणी पातळी आधीच वाढली आहे. भारतातील विविध पर्यटन स्थळांवर सेल्फी आणि रील काढताना अनेक अपघात झाले आहेत. यादरम्यान अनेकांचा मृत्यूही झाला आहे. याबाबत पोलीस-प्रशासनाकडून काही जनजागृती मोहिमाही राबविल्या जात आहेत, तरीही निष्काळजीपणामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे.