JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral News: 70 वर्षीय करोडपतीच्या प्रेमात पडली 23 वर्षीय तरुणी; पण लग्नाच्या दिवशी घडलं भलतंच

Viral News: 70 वर्षीय करोडपतीच्या प्रेमात पडली 23 वर्षीय तरुणी; पण लग्नाच्या दिवशी घडलं भलतंच

एरिका मोझर आणि रिक सायक गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. शेवटी लग्नाचा दिवस आला आणि..

जाहिरात

70 वर्षीय करोडपतीच्या प्रेमात पडली 23 वर्षीय तरुणी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 29 जुलै : ‘प्रेम आंधळं असतं’ असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण आता एक अतिशय अजब घटना समोर आली आहे. यात 23 वर्षांची एक तरुणी 70 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर दोघांनी सोबतच जगण्या मरण्याचं वचनही एकमेकांना दिलं. एरिका मोझर आणि रिक सायक गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. शेवटी लग्नाचा दिवस आला आणि वृद्ध बोहल्यावर चढणारच होता. पण शेवटच्या क्षणी मुलीने त्याला धोका दिला. द सनच्या वृत्तानुसार, 23 वर्षीय एरिका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, जी अमेरिकेची रहिवासी आहे. तिने सांगितलं, की करोडपती रिकसोबत तिची पहिली भेट एका डेटिंग शोमध्ये झाली होती. एरिका म्हणाली, ‘रिक माझ्यापेक्षा 46 वर्षांनी मोठा होता, पण मी त्याच्या प्रेमात कशी पडली हे मला माहीत नाही.’ पण लग्नाच्या दिवशीच एरिकाचं मन बदललं. आपण आपलं आयुष्य उद्धवस्त करणार आहोत, असं तिला वाटत होतं. यानंतर अखेरच्या क्षणी तिने रिकसोबतचं लग्न मोडलं. Chanakya Niti : तुमच्या बायकोलाही आहेत या 4 सवयी; तर नवऱ्यांनो सावध व्हा! उद्ध्वस्त होईल तुमचं आयुष्य एरिका आणि रिक 2021 मध्ये ‘मॅरींग मिलियन्स’ या टीव्ही सीरिजमध्ये दिसले होते. हा शो अशा जोडप्यांचा आहे, जिथे एक व्यक्ती खूप श्रीमंत असतो आणि दुसरा सामान्य माणूस. शोदरम्यान एरिका आणि रिक खूप जवळ आले. मात्र, एरिकाने आता सोशल मीडियावर तिच्या टीव्ही रोमान्सबद्दल उघडपणे बोललं आहे. एरिकाने Tiktok @erica35mm वर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे. ज्यात लोकांना सांगितलं आहे की नॅशनल टीव्हीवर तिने 70 वर्षीय पुरुषाशी जवळजवळ लग्नच केलं होतं. मात्र, आता तिचा विचार बदलला आहे. तिला आता हे लग्न करायचं नाही. ती पुढे म्हणाली, ‘आम्ही दोघे खूप वेगळे आहोत. आम्ही एकसारखे नाही.’’ पण एरिकाच्या या खुलाशामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, एक काळ असा होता की दोघेही एकमेकांना खूप आवडायचे. इंफ्लुएन्सरच्या या व्हिडिओ पोस्टवर नेटिझन्स आणि ‘मॅरींग मिलियन्स’चे भरपूर जोरदार कमेंट करत आहेत. एकाने कमेंट केली आहे की, ‘खरं सांगायचं तर माझा तुझ्याबद्दलचा आदर वाढला आहे. तुझ्या जागी इतर स्त्रियांनी पैशासाठी रिकशी लग्न केलं असतं. तर दुसऱ्याने म्हटलं, की त्याला रिकबद्दल वाईट वाटत आहे, कारण त्याने एरिकावर मनापासून प्रेम केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या