JOIN US
मराठी बातम्या / Viral / रंग बदलणारे बेडूक पाहिलेत का? सर्व काही बेडकीणीला आकर्षित करण्यासाठीच...

रंग बदलणारे बेडूक पाहिलेत का? सर्व काही बेडकीणीला आकर्षित करण्यासाठीच...

बेडूक बेडकीणीला आकर्षित करण्यासाठी पाण्यात उड्या मारतात. त्यांच्या उड्याही पाहण्यासारख्या असतात. विविध प्रकारच्या उड्या मारून ते बेडकीणीला आकर्षित करतात.

जाहिरात

पावसात चक्क पिवळ्या रंगाची बेडकं बाहेर पडली आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रामकुमार नायक, प्रतिनिधी दुर्ग, 29 जून : लग्न झाल्यावर नवरा रंग बदलतो हे आपण ऐकलंच असेल पण प्राण्यांमध्येही असं होतं हे कधी ऐकलंय का? बेडकाबाबत असं होतं. मात्र बेडकाचा स्वभाव बदलत नाही, तर प्रजननाची क्रिया झाल्यावर तो पिवळ्याचा हिरवा होतो. खरंतर पिवळ्या रंगाचे बेडूक असतात हेच मोठं आश्चर्य आहे. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यापासून सतत पाऊस पडतोय. या तुफान पावसात चक्क पिवळ्या रंगाची बेडकं बाहेर पडली आहेत. ही हळदीसारखी पिवळीधम्मक बेडकं लोकांच्या आकर्षणाची केंद्र बनली आहेत. लोक कामधंदे सोडून या बेडकांना पाहण्यासाठी गर्दी करतात.

विशेष म्हणजे पिवळ्या रंगाचे सर्व बेडूक नर असतात. यात एकही मादी नसते. हे बेडूक बेडकीणीला आकर्षित करण्यासाठी पाण्यात उड्या मारतात. त्यांच्या उड्याही पाहण्यासारख्या असतात. विविध प्रकारच्या उड्या मारून ते बेडकीणीला आकर्षित करतात. एकदा का एखादी बेडकीण त्यांच्याप्रती आकर्षित झाली की, दोघांमध्ये प्रजननाची क्रिया पार पडते. या क्रियेनंतर पिवळ्याधम्मक बेडकांचा रंग बदलतो आणि ते अगदी सर्वसाधारण बेडकांसारखे दिसू लागतात. ‘ईशान्य’ म्हणजे महादेव! घराच्या या कोपऱ्यात चुकूनही करू नका ‘हे’ काम, अन्यथा… या विशेष प्रकारच्या नर बेडकांना ‘इंडियन बुल फ्रॉग’ असं म्हटलं जातं. ते दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच स्वभावानेही छान असतात. म्हणजेच त्यांच्यापासून कोणालाही कोणताच धोका नसतो. ते कोणाला त्रास देत नाहीत. वर्षभर बिळात राहून ही बेडकं मुसळधार पावसात बाहेर येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या