प्रतिकात्मक फोटो, सोर्स : Google
मुंबई, 5 मे : लग्न हे प्रत्येक मुलामुलींसाठी खूप महत्वाचं असतं. त्यांच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असतो. तसे पाहाता भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या चालीरितींनी लग्न केलं जातं. अनेक रुढी-परंपरा तर अशा आहेत, ज्याबद्दल आपल्यापैकी अनेकांना ठावूक देखील नाही. मग विचार करा की देशभरात आणखी कशा आणि किती परंपरा असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका परंपरेबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल, शिवाय या परंपरेबद्दल ऐकून तुमचं डोक चक्रावेल. आफ्रिकन ग्रेट लेक्स प्रदेशात राहणारे मासाई लोक या प्रदेशातील सर्वात जुने लोक आहेत आणि आजही ते त्यांच्या प्राचीन परंपरा आणि चालीरीतींचे पालन करतात, अशी जीवनशैली जगतात जी शतकानुशतके फारशी बदललेली नाही.
इथे आपल्याच वडिलांशी लग्न करतात मुली, कुठे आहे अशी विचित्र परंपरा?
या लोकांमध्ये आशीर्वाद देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. येथे जेव्हा नवविवाहित जोडपे वधूच्या वडिलांचे आशीर्वाद घेतात. तेव्हा वडील आपल्या मुलीच्या डोक्यावर थुंकून तिला आशीर्वाद देतात.
प्रतिकात्मक फोटो, सोर्स : Google
यानंतर नववधू आपल्या नवऱ्याला घेऊन तेथून पळून जाते. नवऱ्यासोबत जाताना वधूने कोणत्याही परिस्थितीत मागे वळू नये, अन्यथा तिचे दगडात रूपांतर होईल, अशी श्रद्धा आहे. लग्नासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं? सायन्स काय सांगतं? थुंकणे हा मसाईमध्ये एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो आदर व्यक्त करतो. त्यांच्यातील व्यापारी मंडळी एकमेकांना हात मिळवणी करताना तळहातावर थुंकतात आणि वडील नवजात बालकांवर थुंकून आशीर्वाद देता.