JOIN US
मराठी बातम्या / Viral / लाखो रुपयांची नोकरी सोडली अन् बनला अभिनेता, आयुष्याला कलाटणी देणारी कहाणी

लाखो रुपयांची नोकरी सोडली अन् बनला अभिनेता, आयुष्याला कलाटणी देणारी कहाणी

7 मार्च रोजी जगभरात जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. या दिवशी रंगभूमीशी निगडित असलेल्या कलाकारांना स्मरण करण्याचा दिवस आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल झा (गाझियाबाद), 28 मार्च : 27 मार्च रोजी जगभरात जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. या दिवशी रंगभूमीशी निगडित असलेल्या कलाकारांना स्मरण करण्याचा दिवस आहे. राज्य, देश आणि जगामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध अशा कलाकारांचा सन्मान केला जातो. 1961 मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने वर्ल्ड थिएटर डे ची स्थापना केली होती.

दरम्यान जगभरात मोठे कलाकार झाले. परंतु काही कलाकारांची कहाणी आयुष्याला कलाटणी देणारी असते. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील कलाकार प्रभाकर यांची कथाही खूप रंजक आहे. प्रभाकरना कॉलेजपासूनच अभिनयाची आवड होती. परंतु काही कारणास्तव त्याला परदेशात चांगली नोकरी मिळाल्याने तो तिकडे गेला.  परंतु त्याचा नोकरीत मन रमत नसल्याने पुन्हा राजीनामा देऊन देशात परतले आणि अभिनयाला सुरुवात केली.

OMG! तरूणाने चक्क बाटलीतून पाजले किंग कोब्राला पाणी, Video व्हायरल

संबंधित बातम्या

प्रभाकरचा जन्म गाझियाबादमध्ये 1976 मध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण साहिबाबाद येथून झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डेहराडूनमधून एमबीए पूर्ण केले. सुमारे 17 वर्षे कॉर्पोरेट जगतात काम केल्याची त्यांनी माहिती दिली.

परदेशात मल्टी नॅशनल बँकेत (HSBC) वरिष्ठ सहयोगी उपाध्यक्ष म्हणून काम करूनही ते स्वतःवर समाधानी नव्हते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि देशात परतले आणि अभिनयाला सुरुवात केली.

प्रभाकरने सांगितले की, मनोज बाजपेयी नसरुद्दीन शाह, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विक्की कौशल हे त्याचे रोल मॉडेल आहेत. त्यांना पाहून अभिनयात आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तिरेखेचे ​​लेखन, ज्यामुळे ते पात्र महान होते. उदाहरणार्थ, आनंद चित्रपटातील राजेश खन्ना यांची व्यक्तिरेखा त्यांना महान वाटते. राजेश खन्ना हे पात्र अगदी तसंच जगायला त्यांना आवडत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

जाहिरात
नदीत उतरून मगरीला हाताने खाऊ घालत होतं जोडपं; पुढे काय झालं पाहा..VIDEO

मुंबईत संघर्ष करणारे अनेक कलाकार आहेत. अनेक वेळा सुप्रसिद्ध स्टार्सही काम नसल्यामुळे आत्महत्या करतात. मी म्हणेन की अभिनेत्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आवडीशी चिकटून राहणे. जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत तुम्ही तुमच्या आवडीला चिकटून राहावे. एकदा हार मानली तर काही शक्य नसल्याचेही ते म्हणाले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या