नवी दिल्ली 28 मार्च : एखाद्या प्राण्याला पाळणं हा एक समाधानकारक अनुभव असू शकतो. पण मगरीला पाळण्याच्या आणि तिच्यासोबत खेळण्याच्या विचारानेही तुम्ही भीतीने थरथर कापू लागाल. मात्र एका जोडप्याने असं काही केलं जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. फ्लोरिडातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक व्यक्ती आणि त्याचा जोडीदार मगर असलेल्या नदीत उतरताना दिसतात. इतकंच नाही तर ते नदीत उतरून चक्क मगरीला आपल्या हातांनी खायला घालताना दिसतात. OMG! तरूणाने चक्क बाटलीतून पाजले किंग कोब्राला पाणी, Video व्हायरल हा व्हिडिओ एवढ्यावरच संपत नाही. ती व्यक्ती मगरीला खायला देण्यासोबतच तिला कुरवळतानाही दिसते. ओन्ली इन फ्लोरिडा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही एक महिला आणि पुरुष नदीच्या काठावर बसून संगीत ऐकताना पाहू शकता. ते सुंदर दृश्याचा आनंद घेत असताना नदीत उतरतात. इतक्यात एक मगर त्यांच्या जवळ येते. मात्र ते घाबरत नाहीत तर पटकन मगरीला काहीतरी खायला देतात आणि मग प्राण्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात.
जेव्हा मगर पोहत दूर जाते तेव्हा ते तिच्यासाठी आणखी अन्न फेकतात. व्हिडिओच्या काही सेकंदांच्या या व्हिडिओनं नेटकऱ्यांनाही थक्क केलं आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर सहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. काही वापरकर्त्यांनी या जोडप्याची खिल्ली उडवली, तर काही सोशल मीडिया वापरकर्ते या व्यक्तीला बेजबाबदार आणि अज्ञानी म्हणत आहेत. एका यूजरने म्हटलं की, ‘हे एक अशिक्षित जोडपं आहे. मी पण फ्लोरिडाचा आहे. तुम्ही मगरींवर विश्वास ठेवू शकत नाही." दुसर्या वापरकर्त्याने लिहिलं, “लोकांनी हे करू नये! मगरींनी आपल्या जवळ यावं असं आपल्याला खरंच वाटतं का? आपण त्यांच्यापासून अंतर राखलं पाहिजे.”