JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : आधी रिक्षावाल्यासोबत वाद मग महिलेला नेलं फरफटत, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

Viral Video : आधी रिक्षावाल्यासोबत वाद मग महिलेला नेलं फरफटत, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

येथे एका महिलेला रिक्षा चालकाने काही किलोमीटर फरफटत रस्त्यावरुन नेलं, ज्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. हे संपूर्ण प्रकरण जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे.

जाहिरात

कोल्हापूर अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 06 जुलै (ज्ञानेश्वर साळूंखे) : एक भयानक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली जी पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो दिल्लीतील एका घटनेची पुनरावृत्ती सारखाच आहे. खरंतर दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी एक भयंकर अपघात घडला होता, ज्यामध्ये एका कार चालकाने एका महिलेले रस्त्यावर फरफट नेटे, ज्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. असंच एक प्रकरण महाराष्ट्रात देखील घडलं. येथे एका महिलेला रिक्षा चालकाने काही किलोमीटर फरफटत रस्त्यावरुन नेलं, ज्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. हे संपूर्ण प्रकरण जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. ही घटना 6 जुलैची आहे जी महाराष्ट्रातील कोल्हापुरमधील राजारामपुरी येथे घडली. रिक्षात साडी अडकल्याने प्रवासी महिला गेली फरफटत गेली असल्याचं सांगण्यात येत आहे. माहितीनुसार रिक्षाचालक आणि महिलेमध्ये काही काळापूर्वी भाड्यावरून वाद झाला होता. वाद मिटल्यानंतर रिक्षाचालक निघून जात असताना ही घटना घडली. या प्रकरणार महिला गंभीर जखमी झाली आहे आणि जवळील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे.

संबंधित बातम्या

या प्रकरणाबद्दल रिक्षा चालकाकडे विचारपुस केली असता त्याला या सगळ्याची कल्पना नसल्याचं त्याने सांगितलं. परंतू व्हिडीओत काही वेगळंच दृश्य दिसतंय. एक व्यक्ती जेव्हा समोरुन येऊन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा ही रिक्षा वाल्याने त्याकडे लक्ष दिलं नाही. शिवाय त्याच्या रिक्षामागे काही लोक पळत होते आणि आवाज देखील करत होते. ते देखील रिक्षा चालकाला ऐकू आलं नसेल का? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या