व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 14 जुलै : जुगाडच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे लोक त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर रोजच्या वापरातील वस्तूंषी बनवतात आणि तयार करतात, जे पाहून कधी कधी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. अनेकदा देसी जुगाडशी संबंधित एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत राहतात, जे पाहून अनेकवेळा आश्चर्याचा धक्का बसतो. नुकताच असाच एक मजेशीर देसी जुगाडचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही जुगाड करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक नक्कीच कराल. व्हिडीओमध्ये एका महिलेने नळ तुटल्यानंतर नळात अशी वस्तू बसवली, जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. Desi Jugad : पाणी काढण्यासाठी व्यक्तीनं लावला जुगाड; Video पाहून नक्कीच कराल कौतुक व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, टॅप तुटल्यानंतर महिलेने त्याच्या जागी अशी वस्तू बसवली, ज्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष त्याच्याकडे वळले. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहिला जात आहे आणि खूप पसंत देखील केला जात आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला महिला पाणी भरण्यासाठी बादली घेऊन येत असल्याचे दिसत आहे. या दरम्यान आधीच तुटलेल्या नळातून पाणी भरणे कठीण होते. पुढे व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बाई तुटलेल्या नळीच्या जागी रिकाम्या टूथपेस्टच्या आवरणाला लावते, मग तिथे पाणी व्यवस्थित येते ज्यामुळे या महिलेचा फायदाच होतो. Viral Video : मस्करीची झाली कुस्करी, भुकेनं व्याकूळ मगरीसमोर मित्राला फेकलं आणि… एवढंच काय तर पाणी थांबवण्यासाठी ही महिला टुथपेस्टच्या आवरणाला झाकण देखील लावते, ज्यानंतर पाणी येणं थांबतं. हा जुगाड खरंतर खुपच फायद्याचा ठरला. जिथे नळासाठी 500 ते 1000 रुपये द्यावे लागले असते तिथे या महिलेनं अगदी टाकावू वस्तूपासून भन्नाट जुगाड केला, जो काम चलावू आहे.
हा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो लाखो वेळा पाहिला गेला आहे. लोकांनी या व्हिडीओला असंख्य लाईक्स दिले आहेत शिवाय तो शेअर देखील केला गेला आहे.