JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : लाथा बुक्क्या, चप्पल मारत भांडण; लोकल ट्रेनमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Viral Video : लाथा बुक्क्या, चप्पल मारत भांडण; लोकल ट्रेनमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

ट्रेनमध्ये अनेक प्रवासी सोबत प्रवास करतात. मग काय एवढ्या लोकांमध्ये कोणाची ना कोणाची बाचाबाची होणं सहाजिक आहे. मात्र इथे फक्त बाचाबाचीच नाही, फक्त वादच नाहीतर तुफान हाणामारीही पहायला मिळते.

जाहिरात

लोकल ट्रेनमध्ये महिलांची तुफान हाणामारी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 जुलै : ट्रेनमध्ये अनेक प्रवासी सोबत प्रवास करतात. मग काय एवढ्या लोकांमध्ये कोणाची ना कोणाची बाचाबाची होणं सहाजिक आहे. मात्र इथे फक्त बाचाबाचीच नाही, फक्त वादच नाहीतर तुफान हाणामारीही पहायला मिळते. आत्तापर्यंत ट्रेनमधील अनेक हाणामारीच्या, भांडणाच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून ट्रेनमधील भांडणाचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. सध्या हाणामारीचा समोर आलेला व्हिडीओ कोलकाताचा आहे. या ठिकाणी ट्रेनमध्ये महिलांची जबर हाणामारी झाली. याचा व्हिडीओही व्हायरल झाला असून सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकल ट्रेनच्या महिला डब्यात महिलांच्या एका गटाने आपापसात मारामारी सुरू केली. व्हिडिओमध्ये महिला ओरडताना, धक्काबुक्की करताना आणि चप्पलने एकमेकांना मारहाण करताना दिसतंय. मात्र, महिलांच्या भांडणाचे कारण स्पष्ट झालेलं नाही. लोकल ट्रेनमधील हा भांडणाचा व्हिडओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

संबंधित बातम्या

हा महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ @Ayushihihaha नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 30 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेवर वाऱ्यासारखा फिरत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वीही विविध शहरातून ट्रेनमधील भांडणांचे व्हिडीओ समोर आले आहेत. कोणत्याही कारणावरुन लोक भांडतात आणि एकमेकांवर धावून जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या