समुद्र किनाऱ्यावर महिलेला दिसला विचित्र जीव
नवी दिल्ली, 16 जुलै : जगात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत ज्या हळूहळू समोर येत असतात. सोशल मीडियावर अचानक काहीतरी नवीन आणि रहस्यमयी गोष्टी समोर येत असतात. सध्या समोर आलेली घटना अशाच रहस्यमयी गोष्टीविषयी आहे. एका महिलेला समुद्रकिनारी एक रहस्यमयी एलियनसारखी गोष्ट आढळली. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा फिरत आहे. सध्या समोर आलेला फोटो एक रहस्यमयी असून यातील दिसणारा नेमका कोणत्या जीवाचा अवशेष आहे हे ओळखणं कठिण आहे. तज्ज्ञांनही याची ओळख पटवायला असमर्थ दिसून आले.
समुद्र किनाऱ्यावर महिलेला एक जीवाचा अवशेष आढळला. हा जीव जलपरी एलियन सारखा दिसणारा होता. याचा फोटो शेअर करत 34 वर्षीय महिला बॉल्बी ओट्सनं सांगितलं की, हा जलपरी सारखा दिसणारा जीव होता आणि याला माणसारखी खोपडीही होती. हा जीव तिला तेव्हा दिसला जेव्हा ती क्वींसलैडच्या केपेस समुद्राच्या किनाऱ्यावर चालत होती. तिला याला धडकून ठेच लागली तेव्हा तिला दिसला. याविषयी न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिलं आहे. Viral Video : महाकाय अजगराच्या जबड्याला पकडलं, पुढे व्यक्तीसोबत घडलं भयानक दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर वहायरल होत आहे. लोक या फोटोला पाहून आश्चर्यकारक झाले आहेत. आणि हा नेमका कोणता जीव आहे याविषयी तर्कवितर्क लावत आहेत.