जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : महाकाय अजगराच्या जबड्याला पकडलं, पुढे व्यक्तीसोबत घडलं भयानक

Viral Video : महाकाय अजगराच्या जबड्याला पकडलं, पुढे व्यक्तीसोबत घडलं भयानक

 महाकाय अजगराच्या जबड्याला पकडलं

महाकाय अजगराच्या जबड्याला पकडलं

असे अनेक प्राणी जगात अस्तित्वात आहेत ज्यांचं नाव घेतलं तरी घाम फुटतो. त्यांच्या जवळ जाणं किंवा त्यांच्याशी मस्ती करणं ही दूरचीच गोष्ट आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जुलै : असे अनेक प्राणी जगात अस्तित्वात आहेत ज्यांचं नाव घेतलं तरी घाम फुटतो. त्यांच्या जवळ जाणं किंवा त्यांच्याशी मस्ती करणं ही दूरचीच गोष्ट आहे. यातीलच धोकादायक प्राणी म्हणजे, साप, नाग, अजगर. या धोकादायक प्राण्यांच्या हल्ल्यात वाचणं कठिणा आहे. कोण, कधी, कसा हल्ला करेल काही सांगता येत नाही. असे धोकादायक प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. एका व्यक्तीला अजगरासोबत मस्ती करणं अवघड पडलं आहे. अजगरासोबतची मस्ती त्याच्यावरच उलटल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती अजगराला घेऊन चालली आहे. महाकाय अगराला उचलल्यामुळे तो संतापला आहे. महाकाय अजगराने संतापात व्यक्तीवर हल्ला केला. तो जबड्यात व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र व्यक्तीनं अजगराच्या मानेला पकडलं होतं तर अजगराने व्यक्तीला उरलेल्या भागात गुंडाळले. त्यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो ओरडायला लागला. तेवढ्यात उपस्थित असलेल्या लोकांनी त्याची मदत करत त्याला वाचवलं.

जाहिरात

हा व्हिडिओ रात्री रेकॉर्ड करण्यात आला होता. एका रहिवासी परिसरात एक महाकाय अजगर फिरताना दिसला. त्याला पकडण्यासाठी बचाव पथकाला बोलावण्यात आलं. बचाव पथकातील एका सदस्याने घाईघाईने त्याचा जबडा पकडला आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र त्यानंतर या अजगराने त्या व्यक्तीवरही हल्ला केला. हा धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याने पाहिले त्याला धक्काच बसला. साप पकडणे हा काही विनोद नाही. यामध्ये मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे. सापाचा जबडा बंद असला तरी तो हल्ला करण्याचे इतर मार्ग शोधतो. हा सध्याचा समोर आलेला व्हिडीओ @jorgeheathen नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसतायेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात