JOIN US
मराठी बातम्या / Viral / महिलेनं मगरीच्या जबड्यात हात घालताच प्राण्याने केला हल्ला अन्..; धडकी भरवणारा VIDEO

महिलेनं मगरीच्या जबड्यात हात घालताच प्राण्याने केला हल्ला अन्..; धडकी भरवणारा VIDEO

महिला मगरीच्या जबड्याला हात लावते आणि नंतर मगरीच्या उघड्या तोंडात हात ठेवते. आधी मगर तोंड उघडं ठेवून पूर्णपणे शांत बसलेली दिसते. मात्र महिलेनं हात लावताच मगरीनं तोंड बंद केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 मार्च : मगरी किती धोकादायक असतात याची कल्पना तुम्ही तेव्हाच करू शकता, जेव्हा हा प्राणी तुमच्यासमोर असेल. पण असा विचार करणं मूर्खपणाचं ठरेल, कारण जर कोणी मगरीच्या संपर्कात आलं तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. मात्र, प्राणीसंग्रहालयाचे प्रशिक्षक या प्राण्यांसोबत अशा गोष्टी करतात ज्या भयानक दिसतात, परंतु त्यांच्यासाठी सामान्य असतात. नुकतंच एका ट्रेनरने लोकांसमोरच मगरीच्या तोंडात हात घातल्यावर असंच दृश्य पाहायला मिळालं. VIDEO - इवल्याशा उंदराने मिनिटात गिळले 10 गाजर; बकाबका खाल्ल्यानंतर घडलं ते धक्कादायक @africasafariplanet या Instagram अकाऊंटवर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक महिला प्राणीसंग्रहालय किंवा उद्यानात मगरीच्या हल्ल्याची पद्धत लोकांना समजावून सांगताना दिसत आहे. अनेक उद्यानांमध्ये असे शो ठेवले जातात, ज्यामध्ये प्राण्यांच्या हल्ल्याची पद्धत दाखवली जाते.

संबंधित बातम्या

या व्हिडिओमध्ये महिला सांगत आहे की, लांब तोंडामुळे मगरी त्यांच्या जबड्याखाली पाहू शकत नाहीत, त्यामुळे ते त्यांच्या संवेदनशील त्वचेला काही जाणवताच हल्ला करतात. हे सांगत महिला मगरीच्या जबड्याला हात लावते आणि नंतर मगरीच्या उघड्या तोंडात हात ठेवते. आधी मगर तोंड उघडं ठेवून पूर्णपणे शांत बसलेली दिसते. मात्र महिलेनं हात लावताच मगरीनं तोंड बंद केलं. असं वाटतं की ती एक सेकंदापेक्षाही कमी वेळात आपला जबडा बंद करते. मात्र, महिलेलाही कदाचित याची भरपूर सवय झालेली आहे. त्यामुळे तिने लगेचच आपला हात बाहेर खेचला. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तर अनेकजण कमेंट करून यावर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एकाने म्हटलं की महिला प्रत्येकवेळी मगरीच्या तोंडातून हात बाहेर काढल्यानंतर देवाचे आभार मानत असेल. दुसऱ्या एकाने म्हटलं, की मगरही विचार करत असेल, की एक ना एक दिवस मी हा हात पकडेल. तर, आणखी एकाने म्हटलं की आपल्या मनोरंजनासाठी प्राण्यांना कैदेत ठेवणं बंद केलं पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या