प्रतिकात्मक फोटो
लखनऊ 03 एप्रिल : मन हेलावून टाकणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली येथे एका आईने तिच्या तीन मुलांसह भरधाव वेगात असलेल्या ट्रेनसमोर उडी मारली. या अपघातात महिला आणि तिच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 8 महिन्यांचं बालक चमत्कारिकरित्या बचावलं. रेल्वेची धडक बसल्यानंतर हे निष्पाप बालक आईच्या मांडीवरुन फेकलं गेलं अन् रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी पडलं. तिथून ट्रेन जाऊनही त्या मुलाला ओरखडाही आला नाही. दुसरीकडे, माहिती मिळताच मुगलसराय पोलिसांनी घटनास्थळ गाठून आई आणि दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. या घटनेमागे प्रेमप्रकरण आणि कौटुंबिक वाद असल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक! ट्रेनमध्ये चढण्यावरून वाद, माथेफिरूने सहप्रवाशांनाच पेटवलं; तिघांचा मृत्यू, 9 जखमी मिळालेल्या माहितीनुसार, चंदौली जिल्ह्यातील अलीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील परोरवा गावातील मंजू देवी हिचं लग्न वाराणसीच्या चितईपूरमध्ये झालं होतं. त्यानंतर तिला दोन मुली आणि एक मुलगा झाला. मंजू देवी हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे तिचा पतीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. वाद इतका वाढला होता की हे प्रकरण वाराणसी पोलिसांपर्यंत पोहोचलं. रविवारी दुपारी वाराणसीच्या चिताईपूर भागात असलेल्या पोलीस चौकीतही या वादाबाबत पंचायत झाली. त्यादरम्यान ही महिला तिथून निघून चंदौली येथे आली, असं सांगितलं जात आहे. यानंतर महिला आपल्या मुलांसह मुगलसराय कोतवाली परिसरात वाराणसी-मुगलसराय रेल्वे ट्रॅकवर पोहोचली. तिने मुलांना घेऊन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारली. विवाहित महिलेसोबतचं अफेअर 2 मुलांच्या बापाला भोवलं; अतिशय भयानक झाला प्रेमाचा शेवट रेल्वेने धडक दिल्याने मंजू आणि तिच्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. मात्र तिच्या मांडीवर असलेला 8 महिन्याचा निरागस बालक रेल्वेच्या धडकेने रेल्वे रुळाच्या मध्यभागी पडला. पण निसर्गाचा करिष्मा पाहा, की या निरागस बालकाच्या अंगावरून संपूर्ण ट्रेन गेली. तरीही या बालकाला एक ओरखडाही लागला नाही. दुसरीकडे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच मुगलसराय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे रुळावर पडलेल्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलं. दुसरीकडे, पोलिसांनी मंजू देवी आणि रूप यांच्या दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून कायदेशीर कारवाई सुरू आहे.