प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
वॉशिंग्टन, 02 मार्च : आता कुठे जग कोरोना तून सावरत आहेत. त्याच अॅडनोव्हायरसची दहशत आता निर्माण झाली आहे. भारतातही या व्हायरसचे रुग्ण सापडले आहेत. हे संकट कमी की काय आता आणखी एका संकटाचा धोका दिसून येतो आहे. एका महिलेच्या खतरनाक सवयीमुळे जगावर भयंकर संकट येऊ शकतं. महिलेची सवय संपूर्ण जगावर भारी पडू शकते. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अमेरिकेत राहणारी ग्रेटचेन टेस्टा, जिनं तिच्या घरात खतरनाक फंगस उगवत आहे, जे जगाला संकटात टाकतील. धक्कादायक म्हणजे कित्येक कालावधीपासून महिला हे फंगस खातेसुद्धा. पण त्या फंगसचा महिलेवर काहीच दुष्परिणाम होत नाही. महिलेने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर हा फंगसचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. महिलेने आपल्या व्हिडीओत घराबाहेरी झाडावर या फंगसची लागण झालेल्या मुंग्याही दाखवल्या आहेत. खरंच माणसं Zombie बनणार? आपल्यापासून फक्त तीन पावलांवर; तज्ज्ञांनी दिला खतरनाक Alert हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तज्ज्ञांनी सांगितलं की, हे फंगस मुंगीच्या शरीराच्या माध्यमातून विकसित होऊ शकतं. तिच्या शरीरातील पोषक तत्वांवर वाढून ते तिच्या मेंदूवर हल्ला करतात.
यूके डेली स्टारच्या वृत्ता नुसार हा फंगस दुसरा तिसरा कोणता नाही तर झोम्बी फंगस कॉर्डीसेप्स. हो तोच झोम्बी जो तुम्ही फिल्ममध्ये पाहिला. ज्यात माणसं झोम्बी बनतात, ते जिवंत मृतदेहच असतात आणि इतर माणसांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडतात. फिल्ममध्ये ज्याप्रमाणे माणसं झोम्बी बनली तसं प्रत्यक्षातही माणसांना झोम्बी बनवणारा फंगस असल्याचं सांगितलं जातं आहे. यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. ही महिला माणसांना झोम्बी बनवू शकेल असंच हे फंगस आपल्या घरात उगवते आहे आणि खाते आहे. अरे बापरे! मोबाईल पाहताच येते चक्कर आणि उलटी; महिलेला झाला असा विचित्र आजार डेली मेलच्या रिपोर्टनुसार ज न्यूयॉर्क बॉटनिकल गार्डनमधील माइकोलॉजीचे असिस्टंट क्युरेट जोआओ अरौजे म्हणाले, कॉर्डिसेप्समध्ये मुंग्यांना झोम्बीमध्ये बदलण्याची शक्यता आहे. आमच्या अंदाजानुसार सुमारे साडेचार कोटी वर्षांपूर्वी या फंगसने पहिल्या मुंगीला संक्रमित केलं होतं. धरतीवर असे 35 फंगस आहेत, ज्यांना किड्यांना झोम्बीमध्ये बदलण्याची क्षमता आहे. अमेरिका, ब्राझील, जपान आणि आफ्रिकेच्या काही भागात हे आढलून येतात.
तज्ज्ञ म्हणाले, सध्या कॉर्डीसेप्स मुंग्यांसारख्या थंड रक्ताच्या प्रजातींवर हल्ला करत आहे. जर कॉर्डिसेप्स तापमानात स्वतःला अॅडजस्ट करू शकले तर चिंतेचा विषय आहे. हे फंगस माणसांपासून फक्त तीन पावले दूर आहेत, असा इशाराही तज्ज्ञांनी याआधी दिला आहे.