रिपोर्ट पाहून हादरली महिला
नवी दिल्ली 04 जून : मानवी शरीर खूप गुंतागुंतीचं आहे. माणसाने आपल्या शरीराची अतिशय काळजी घेत त्याला जपलं पाहिजे. जर हे केलं नाही तर त्याचे परिणाम खूप भयानक असू शकतात. कधीकधी यामुळे व्यक्तीला जीवही गमवावा लागतो. असाच काहीसा प्रकार इंग्लंडमध्ये राहणाऱ्या मार्सियासोबत घडला. अनेक दिवसांपासून तिच्या डोळ्यात वेदना होत होत्या. तसंच, तिला गोष्टी अस्पष्ट दिसत होत्या. अशा परिस्थितीत तिने नेत्रतज्ज्ञांकडे जाण्याचा निर्णय घेतला. 45 वर्षीय मार्सियाच्या डोळ्यात बराच काळ वेदना होत होत्या. यासोबतच तिला पाहण्यातही त्रास होत होता. मार्सियाला वाटलं की डोळ्यांना काहीतरी इन्फेक्शन झालं आहे. डोळ्याला संसर्ग झाल्याचं समजून तिने याकडे दुर्लक्ष केलं. अनेक दिवस तिने डॉक्टरांकडे जाणंही टाळलं. पण वेदना कमी न झाल्याने अखेरीस मार्सियाने नेत्ररोग तज्ञांची भेट घेतली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिचे डोळे पूर्णपणे ठीक असल्याचं आढळून आलं. तिच्या डोळ्यात काहीही इन्फेक्शन झालेलं नव्हतं. तर, मार्सियाला ब्रेन ट्यूमर झाला होता. जिचा बळी दिला त्याच बकरीच्या डोळ्याने घेतला व्यक्तीचा जीव; मटण खाताना ही चूक कधीच करू नका डॉक्टरांनी मार्सियाला सांगितलं, की तिच्या मेंदूमध्ये एक प्रचंड मोठी गाठ आहे. ही गाठ इतकी मोठी होती, की ती मार्सियाच्या डोळ्यांची नस दाबत होती. त्यामुळे तिला गोष्टी अस्पष्ट दिसत होत्या. सुदैवाने डॉक्टरांनी प्राथमिक अवस्थेतच गाठ शोधून काढली. त्यामुळे उपचारात कोणतीही अडचण आली नाही. मार्सियावर लगेचच शस्त्रक्रिया झाली आणि आता ती बरी आहे. मार्सियाने तिच्या कहाणीद्वारे इतर लोकांना जागरूक केलं. शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका असं तिने सांगितलं. तुमचं शरीर तुम्हाला सिग्नल देत असतं. ते समजून घ्या आणि वेळीच उपचार घ्या, असं ती म्हणाली.