रायपूर 04 जुलै : बकरीचा डोळा एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतो, असा विचार तुम्ही कधी केला का? याचं उत्तर कदाचित नाही असंच असेल. पण छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यातील एका गावकऱ्यासोबत अशीच एक घटना घडली. यात बकरीच्या डोळ्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेत व्यक्तीने बकऱ्याचा बळी दिल्यानंतर त्याचा डोळा खाल्ला. मात्र हा डोळा त्याच्या घशात अडकला, त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण सुरजपूरला लागून असलेल्या पर्री गावाशी संबंधित आहे. रामानुजनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मदनपूर गावात राहणारा 50 वर्षीय बागर साय हा रविवारी गावातील काही मित्रांसह प्रसिद्ध खोपा धाम येथे पोहोचला होता. त्याने काहीतरी नवस मागितला होता. नवस पूर्ण झाल्यावर बकऱ्याचा बळी देण्यासाठी तो खोपा धामला पोहोचला. सिंहिणीचा गायीवर हल्ला; वाचवण्यासाठी शेतकरी दगड घेऊन पुढे आला अन्…, Video चा शेवट पाहाच इथे पूजा केल्यानंतर त्यानी बकरीचा बळी दिला. यानंतर सर्वांनी मिळून बकऱ्याच्या मांसाची भाजी बनवली. तेव्हाच बागरने मटणाच्या भाजीतून बकऱ्याचा डोळा काढला आणि मोठ्या थाटात खायला सुरुवात केली. पण डोळा त्याच्या घशात अडकला. बकरीचा डोळा घशात अडकल्याने बागरला त्रास होऊ लागला. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. ग्रामस्थांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यान तिथेच त्याचा मृत्यू झाला. बागर यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेतली. बागर याच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसंच या अजब घटनेची परिसरातही चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.