JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! कुठला प्राणी नाही, तर स्वारीसाठी महिला थेट पक्षावरच बसली; पुढे काय झालं पाहा..VIDEO

बापरे! कुठला प्राणी नाही, तर स्वारीसाठी महिला थेट पक्षावरच बसली; पुढे काय झालं पाहा..VIDEO

तुम्ही कल्पना करू शकता का, की एखादी व्यक्ती उंट, घोडा किंवा हत्तीवर स्वार होण्याऐवजी एखाद्या पक्षावर स्वार होऊ शकते. असंच दृश्य एका प्राणीसंग्रहालयात पाहायला मिळालं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 16 मार्च : तुम्ही हत्ती, घोडा किंवा उंटावर स्वारी केली असेल. यात भरपूर मजाही येते. उंटावर स्वार व्हायचे असेल तर राजस्थान हेच ​​योग्य ठिकाण आहे. युरोप आणि अमेरिकेतून मोठ्या संख्येने लोक येथे उंट स्वारीचा आनंद लुटण्यासाठी येतात. कर्नाटकातील श्रीरंगपटना ते रामपूर, रंगनाथिट्टू आणि बेलागोला मार्गे बालमुडी धबधबा हा घोडा सफारीसाठी प्रसिद्ध आहे. इथेही लांबून लोक येतात. भल्यामोठ्या अस्वलाच्या अंगावर बसून व्यक्तीचं भयंकर कृत्य, पाहा काय केलं हत्तीवर बसायचं असेल तर देशात अनेक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. पण तुम्ही कल्पना करू शकता का, की एखादी व्यक्ती उंट, घोडा किंवा हत्तीवर स्वार होण्याऐवजी एखाद्या पक्षावर स्वार होऊ शकते. असंच दृश्य एका प्राणीसंग्रहालयात पाहायला मिळालं. जिथे एक महिला शहामृगावर स्वार होताना दिसली. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ pstore makasarr नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला एक महिला शहामृगावर बसलेली दिसेल. ती शहामृगावर बसताच तो वेगाने धावू लागतो. त्याचा वेग पाहता विश्वासच बसत नाही की एखाद्या पक्षामध्ये इतकी ताकद असते, की तो वजन उचलू शकतो आणि इतक्या वेगाने धावू शकतो. पण व्हिडिओमध्ये शहामृग न डगमगता वेगाने धावताना दिसतो. व्हिडिओ पाहून असं जाणवतं की इथे ऑस्ट्रिच रायडिंग सामान्य बाब आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात.

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. आतापर्यंत याला 1.60 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इन्स्टाग्राम यूजर्स याला रोमांचक म्हणत आहेत, तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिलं की, ‘मलाही अशी रायडिंग करायची आहे. पण हे कुठं आहे? दुसर्‍याने लिहिलं केली, ही क्रूरता आहे. प्राण्यांबद्दल सहानुभूती नाही. दुसर्‍याने लिहिलं, कदाचित त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या