JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video Viral : जग्वारचा मगरीवर हल्ला; दोन्ही धोकादायक शिकाऱ्यांमध्ये कोण जिंकेल?

Video Viral : जग्वारचा मगरीवर हल्ला; दोन्ही धोकादायक शिकाऱ्यांमध्ये कोण जिंकेल?

या व्हिडीओमध्ये एक मादी जग्वार पाण्यात राहून पाण्यातील सर्वात धोकादायक प्राण्याची शिकार करण्याच्या तयारीत दिसत आहे.

जाहिरात

जग्वारचा मगरीवर हल्ला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून : सोशल मीडियाच्या दुनियेत व्हिडीओची कमी नाही. इथे कधी मजेदात तर कधी धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इथे प्राणी प्रेमींची देखील कमी नाही, त्यामुळे प्राणांसंबंधीत देखील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी शिकारीचे व्हिडीओ असतात तर कधी क्यूट प्राण्यांचे सध्या समोर आलेला व्हिडीओ मात्र तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकवेल. या व्हिडीओमध्ये एक मादी जग्वार पाण्यात राहून पाण्यातील सर्वात धोकादायक प्राण्याची शिकार करताना पाहायला मिळालं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला जग्वार किती धोकादायक आहे हे समजेल. तो रागावलेल्या बैलासमोर झोपला, बैल धावत आला आणि… Video पाहण्याची हिंमत असेल तरच पाहा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मादी जग्वार शांतपणे पाण्याखाली लपून बसल्याचे दिसून येते. कधी ती श्वास घेताना तर कधी हालचाल करताना दिसते. तेव्हा अचानक ती मगरीवर हल्ला करते. त्यानंतर मगरीला ती पाण्यातून बाहेर काढत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला पसंती देत आहेत.

संबंधित बातम्या

या व्हायरल व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. खरोखच हा व्हिडीओ हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. कारण एवढ्या जवळून दोन्ही धोकादायक प्राण्यांमधील लढाईचं साक्षीदार होणं काही सोपं काम नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या