JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुणाचा तो सेल्फी शेवटचाच, हत्तीजवळ गेला आणि धक्कादायक घडलं

तरुणाचा तो सेल्फी शेवटचाच, हत्तीजवळ गेला आणि धक्कादायक घडलं

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २ दिवसांपासून दुर्गकोंडलं आणि पंखजूरच्या मध्यवर्ती भागात हा हत्ती फिरत आहे, कळपापासून विभक्त झालेल्या या हत्तीबाबत वनविभागाने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला होता.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 जुलै : आजकाल लोक फोटो घेण्यासाठी किंवा सेल्फीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. परंतू बऱ्यचदा अशा गोष्टी करणं लोकांच्या जिवावर बेतलं आहे. अनेकांनी सेल्फीच्या नादात आपले प्राण गमावले आहे. तर काही लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं. या व्यक्तीने हत्तीसोबत सेल्फी घेण्याच्या नादात आपले प्राण गमावले आहे. ही घटना छत्तीसगढमधल्या कांकेर जिल्ह्यातील पंखाजूर परिसरात आहे. एका जंगली हत्तीने युवकाला पायदळी तुडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, या घटनेची बातमी मिळताच वन कर्मचारी आणि पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले. King Cobra : साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का? व्हिडिओत जे घडलं त्याची कल्पना करू शकत नाही मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २ दिवसांपासून दुर्गकोंडलं आणि पंखजूरच्या मध्यवर्ती भागात हा हत्ती फिरत आहे, कळपापासून विभक्त झालेल्या या हत्तीबाबत वनविभागाने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला होता. पण असं असलं तरी देखील या तरुणाने त्याचं गांभिर्य न समजता, त्याचा जवळ जाण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आपले प्राण देखील गमावले आहे.

संबंधित बातम्या

येथील PV 122 या जंगल परिसरातील गावात राहणारा कमलेश हलदर हा तरुण फिरून त्याच्या वस्तू विकायचा, तो त्याच वस्तू विकण्यासाठी बडे कापसी या गावात आला होता, परिसरात हत्ती असल्याची बातमी कळताच त्याला पाहण्यासाठी तो गेला, जंगली हत्तीला अनेक ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झाले होते, मात्र कमलेश फोटो-व्हिडीओ काढण्यासाठी हत्तीजवळ गेला. दरम्यान संतापलेल्या हत्तीने त्याला वर फेकले आणि नंतर पायाखाली चिरडले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. Viral Video : गाढ झोपलेल्या वाघासमोर हरणाची एन्ट्री, पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून वनविभागाकडून मृताच्या नातेवाईकांना 25 हजारांची तात्काळ मदत सुपूर्द करण्यात आली आहे . वनविभागाच्या माहितीनुसार त्या हत्तीने आतापर्यंत सहा लाख रुपयांचं नुकसान केलेलं असून वनविभागाने त्याची दखल घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या