JOIN US
मराठी बातम्या / Viral / किती सांगायचंय मला! एका बायकोची नवऱ्यासाठी खास पोस्ट; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

किती सांगायचंय मला! एका बायकोची नवऱ्यासाठी खास पोस्ट; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

एका बायकोने आपल्या नवऱ्यासाठी सोशल मीडियावर भरभरून लिहिलं आहे. जे वाचल्यानंतर सर्वजण भावुक झाले आहेत.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मे : पती-पत्नी म्हणजे दोन शरीर एक जीव… नवरा-बायको  जितकं एकमेकांशी भांडतात, त्याच्या कित्येक पटीने एकमेकांवर प्रेम करतात. दोघंही स्वतःचा विचार न करता एकमेकांचा आणि आपल्या कुटुंबाचा विचार करतात. जोडीने संसार करत असताना एकमेकांना खूप काही सांगायचं असतं, पण बोलण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा बोलायची हिंमतच होत नाही. पण अखेर एक बायको आपल्या नवऱ्याबाबत व्यक्त झाली आहे. तिने सोशल मीडियावर त्याच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. जेव्हा मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हतं तेव्हा कपल एकमेकांना लव्ह लेटर लिहित असत आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करत असत. आता एक महिला जिने आपल्या नवऱ्याबाबत सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. लग्नाच्या तब्बल 17 वर्षांनंतर तिने नवऱ्यासाठी ही खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर अनेक जण भावुक झाले आहेत.

कोरा वेबसाईटवर केलेली ही पोस्ट. “पुरुष हा देवाने दिलेल्या सर्वात सुंदर आशीर्वादांपैकी एक आहे”, अशी तिने या पोस्टची सुरुवात केली आहे. पुढे ती म्हणाली, “तो आपल्या पत्नी आणि मुलांसाठी आपल्या तारुण्याचा त्याग करतो. त्यामुळे आपण जीवनाच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो. पुरुष हा असा वारसा आहे, जो आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रम करतो. पण, एवढा त्याग आणि कष्ट करूनही आपण त्याच्या आयुष्यात तणावाशिवाय काहीही देत ​​नाही” जबरा फॅन! फेव्हरेट सेलिब्रिटीला प्रत्यक्ष पाहिलं आणि स्वतःचे ‘डोळे’ विकायला काढले; अजब कारण “जेव्हा तो थोडा वेळ आराम  आणि चांगलं वाटावं म्हणून घराबाहेर पडतो तेव्हा आपण त्याला कुणाची पर्वा नाही असा आरोप करतो. जेव्हा तो घरी बसतो तेव्हा त्याला आळशी म्हणतो. जेव्हा तो मुलांना ओरडतो तेव्हा त्याला जल्लाद बोलतो. जेव्हा तो आपल्या बायकोला नोकरी करू देत नाही तेव्हा आपण त्याला रूढीवादी आणि जुन्या पद्धतीचा म्हणतो. जेव्हा तो आपल्या आईशी चांगले वागतो, तेव्हा त्याला आईचा बाबू म्हणतो. जेव्हा तो आपल्या पत्नीशी प्रेमाने वागतो तेव्हा त्याला पत्नी भक्त म्हणतात” “जगाच्या नजरेत हिरो बनलेल्या पुरुषाला आपल्या मुलाने आपल्याला मागे टाकावे आणि त्याच्यापेक्षा अधिक आनंदी व्हावं असं वाटतं. वडील हे रोबोटसारखे असतात. तो आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करतो आणि त्यांच्या कल्याणासाठी नेहमी प्रार्थना करतो. वडील हा एक असा माणूस आहे जो आपल्या मुलांसाठी सर्व भार सहन करण्यास तयार असतो. मूल चालल्यापासून ते मोठं होईपर्यंत प्रत्येक भार तो आपल्या खांद्यावर घेतो. बाप ही या जगाला एक अशी देणगी आहे जो आपल्या आयुष्यातील सर्व मौल्यवान वस्तू आपल्या मुलांना देतो.” “एक आई आपल्या मुलाला नऊ महिने पोटात ठेवते, पण बापाच्या डोक्यात मात्र आयुष्यभर त्याचा मुलगा असतो. हे जग तेव्हाच सुंदर दिसते जेव्हा आपल्या आयुष्यात पुरुष असतात. अशा स्थितीत आई-वडिलांना वंदन करा. त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा, असं म्हणत महिलेने या पोस्टचा शेवट केला आहे.” गर्लफ्रेंडला ट्रॉलिमधून वाऱ्याच्या वेगानं फिरवून सोडून दिलं आणि घडलं भयंकर महिलेने जे या पोस्टमध्ये म्हटलं आहे की ते तुम्हाला कितपत पटलं आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या