JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरे हिला आवरा! नवरा ऑफिसहून घरी आल्यावर दरवाजातच बायकोने...; कपलचा 'तो' VIDEO VIRAL

अरे हिला आवरा! नवरा ऑफिसहून घरी आल्यावर दरवाजातच बायकोने...; कपलचा 'तो' VIDEO VIRAL

ऑफिसमधून परतलेल्या नवऱ्यासोबत बायकोने जे केलं ते धक्कादायक आहे.

जाहिरात

कपलचा व्हिडीओ व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 मे : कपलचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. याचं कारणही तसंच आहे. नवरा-बायकोचा हा व्हिडीओत, ज्यात ऑफिसमधून आलेल्या नवऱ्याचं त्याच्या बायकोने असं स्वागत केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला. ऑफिसहून घरी परतलेल्या नवऱ्याने घरात पाय ठेवला न ठेवला तोच बायकोने दरवाजात त्याच्यासोबत नको तेच केलं आहे. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की पती कामावर जात असेल आणि पत्नी गृहिणी असेल तर पती घरी परतण्याची वेळ होताच पत्नी त्याची आतुरतेने वाट पाहत असते. तो घरी येताच तिला खूप आनंद होतो. सर्वात आधी थकलेल्या पतीला ती पाणी देते. त्यानंतर त्याला आपल्या हातांनी बनवलेलं जेवण प्रेमाने खाऊ घालते. पण या व्हिडीओत मात्र वेगळंच चित्र आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहाल तर नवरा ऑफिसमधून घरी परततो. तो दरवाजातच उभा आहे. त्याने पायातील चप्पलही काढली नाही. डोक्यावरील हेल्मेट काढून बाजूला ठेवतो. तोच आतून बायको धावत बाहेर येते. दे दणादण! बॉक्सिंग रिंगमध्ये नवरा-बायकोची जबरदस्त फाइटिंग; कोण कोणावर ठरलं भारी? पाहा VIDEO बायको नवऱ्यावर अक्षरशः तुटूनच पडते. ती त्याला बेदम मारहाण करताना दिसते. लाथाबुक्क्यांनी चोपते. बिच्चारा नवरा काहीच करत नाही. तो निमूटपणे तिचा मार खाताना दिसतो. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं आहे. क्रेझी क्लिप या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. पत्नी पतीला असं अचानक का मारला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींनी स्वतःच याबाबत काही मतं व्यक्त केली आहे. कदाचित पतीचे विवाहबाह्य संबंध असावेत, पत्नीने नवऱ्याची चोरी पकडली असेल, असं काही युझर्सनी म्हटलं आहे. वयाने लहान पुरुषासोबत 35 वर्षे लिव्ह इन रिलेशन, वयाच्या साठीत असा परिणाम; महिलेला मोठा धक्का काही मीडिया रिपोर्टनुसार सकाळी ऑफिसला जाताना नवरा कचरा न्यायला विसरला म्हणून बायकोने त्याला मारल्याचा दावा करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान तुम्हाला काय वाटतं, या व्हिडीओतील पत्नीने आपल्या पतीला का मारलं असेल? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या