प्रतिकात्मक फोटो
मुंबई : गॅस सिंलेंडर ही प्रत्येक घरातील महत्वाची गोष्ट आहे. एक दिवस जरी गॅस सिलेंडर संपला असेल तर विना जेवण, विना चहा नाष्टा घराबाहेर पडावं लागतं. ज्यामुळे दिवसाची सुरुवात अगदी खराब होते. दिवसामागून दिवस या सिलेंडरची किंमत वाढत चालली आहे, ज्यामुळे गृहिणींचा महिन्याचा बजेट कोलमडत आहे. आपण या सगळ्याला बाजूला करुन सिलेंडरबाबत एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करु ते म्हणजे गॅसचा वास. जर चुकून कधी गॅस लिक झाला किंवा गॅस चालू राहिला, तर आपल्याला अतिशय घाण असा त्या गॅसचा वास येतो. पण किधी विचार केलाय का की असा वास गॅसला का येतो? यामागचं सायन्स काय आहे? लहान बाळांना का घातले जातात चांदीचे दागिने? या गॅस सिलिंडरबद्दल एक माहिती समोर आली आहे जी धक्कादायक आहे, ती म्हणजे घरांमध्ये वापरल्या जाणार्या एलपीजी सिलिंडरमध्ये भरलेला गॅस गंधहीन असतो. तरीही तो गळतो तेव्हा एक कुजलेला वास आजूबाजूला पसरतो. असं का? दुर्गंधी कशामुळे येते? स्वयंपाकघरात ठेवलेल्या सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर संपूर्ण स्वयंपाकघरात दुर्गंधी पसरते. हा दुर्गंधी मरकॅप्टन नावाच्या रसायनाचा आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, एलपीजी गॅसमध्ये मरकॅप्टन जोडले जाते, कारण लिक्विड पेट्रोलियम गॅस हा एक ज्वलनशील वायू आहे. जो आगीच्या संपर्कात आल्यावर वेगाने जळू लागतो. अशा परिस्थितीत गॅस गळती झाली आणि गळती होणाऱ्या गॅसच्या आजूबाजूला कोणी आग लावली तर मोठी दुर्घटना घडू शकते. हा अपघात एवढा धोकादायक आहे की काही वेळा लोकांना जीवही गमवावा लागतो. लोकांची सतर्कता वाढवण्यासाठी, एलपीजीमध्ये मरकॅप्टन जोडले जाते, ज्यामुळे त्याच्या या उग्र वासामुळे लोकांना समजते की गॅसची गळती झाली आहे किंवा गॅस सिलिंडर लिक आहे.
Mercaptain मुळे वाचतो जीव मरकॅप्टनच्या उग्र वासामुळे अनेक मोठे अपघात टळले आहेत. जेव्हा घरामध्ये मर्कप्टनची दुर्गंधी पसरते तेव्हा लोक सावध होतात आणि गॅस रेग्युलेटर बंद करतात. जर घरामध्ये जास्त गॅस गळती झाली असेल तर घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडा. यानंतर, एक्झॉस्ट चालू करा. घरातून सर्व गॅस निघून गेल्यावरच पुन्हा सिलिंडर वापरा आणि सिलिंडरची समस्या त्वरित दूर करा.