प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 23 फेब्रुवारी : आपल्याकडे अनेक मान्यता आहेत. पण प्रत्येकाचं उत्तर सगळ्यांकडेच असतं असं नाही, काही गोष्टी आपण फार पूर्वी पासून ऐकत आलेलो असतो आणि त्याच गोष्टी आपण स्वत: पाळतो आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील सांगतो. पण याची कारणं आपल्याला माहित नसतात. आता हेच पाहा ना, नारळ फोडण्यासंबंध असं म्हटलं जातं की ते महिलांनी फोडू नये, पण असं का? या मागचं कारण तुम्हाला माहितीय? एखादी महिला आजू-बाजूच्या एखाद्या लहान मुलाला किंवा पुरुषाला नारळ फोडून द्यायला लावते आणि ते देखील ते फोडून देतात, अशावेळी ते कधीही महिलांना असं का असा प्रश्न विचारत नाहीत किंवा महिला देखील त्यांना असं का करायला सांगतात याचं कारण सांगत नाहीत. एवढंच काय तर एका लहान मुलानं प्रश्न विचारला की त्या सांगितलं जातं की असंच असतं, आपल्याकडे महिला किंवा स्त्रीया नारळ फोडत नाहीत. पण यामागचं कारण मात्र सगळ्यांना ठावूक नसतं. इंडक्शन वापरताना तुम्ही ‘या’ चुका तर करत नाही ना? नाहीतर याल अडचणीत आपण नारळाला श्रीफळ म्हणतो, त्याला देवाचा दर्जा देतो, एवढंच काय तर पुजेसाठी देखील आपण त्याला महत्वाचं मानतो, देवाजवळचा नारळ आपण प्रसाद म्हणून खातो मग अशा परिस्थीतीत महिलांना ते फोडण्याची परवानगी हिंदू धर्मात का नाही? चला यामाचं कारण समजून घेऊ. याचा संबंध प्रजनन क्षमतेशी महिला नारळ फोडत नाही, त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी आहे, त्यामुळे तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जुळलेला आहे अशी मान्यता आहे. महिला बीजरूपातच बाळाला जन्म देतात. अगदी त्याचाच संबंध नारळाशी लावला गेला. म्हणूनच हिंदू धर्म शास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात. एकेकाळी विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही, तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला. या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते. नारळात तीन डोळे बनतात, या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते असे शास्त्रात मानले जाते. म्हणून त्याला स्त्रीया हात लावत नाहीत. यामागे आहेत आणखी काही कारणं… यामागे अशी एक कहाणी अशी देखील सांगितली जाते की, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते. तीन देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो.
नारळ हे भगवान विष्णूने पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते. जो देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही.