JOIN US
मराठी बातम्या / Viral / Horn Ok Please असं ट्रकच्या मागे का लिहिलं जातं? यामागचं रंजक कहाणी फार कमी लोकांना ठावूक

Horn Ok Please असं ट्रकच्या मागे का लिहिलं जातं? यामागचं रंजक कहाणी फार कमी लोकांना ठावूक

‘हॉर्न ओके प्लिज’ हे जवळ-जवळ सगळ्याच ट्रकच्या मागे लिहिलं जातं पण असं का? ते लिहिण्या मागचं कारण काय असू शकतं? असा अनेकांना प्रश्न पडतो.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : तुम्ही प्रवासात अनेकदा पाहिलं असेल की काही गाड्या किंवा सहसा ट्रकवर एखादी कवीता किंवा शायरी लिहिली जाते. शिवाय हे ट्रक विविध रंग, लाईट्स आणि इतर गोष्टींनी सजवले जातत. जे पाहताना देखील अगदी मनोरंजक वाटतं. शिवाय आपण कितीही नाही म्हटलं तरी देखील ट्रकवर लिहिलेले शायरी सगळेजण वाचतात वाचतात. शिवाय यावर तुम्ही आणखी एक गोष्ट लिहिलेली पाहिली असेल, ते म्हणजे ‘हॉर्न ओके प्लिज’ हे तर जवळ-जवळ सगळ्याच ट्रकच्या मागे लिहिलं जातं पण असं का? ते लिहिण्या मागचं कारण काय असू शकतं? असा अनेकांना प्रश्न पडतो. चला याबद्दल रंजक गोष्टी जाणून घेऊ. 11 वर्षांपासून दुखत होतं महिलेच्या पोटात, MRI करताच समोर आलं धक्कादायक सत्य ‘हॉर्न ओके प्लीज’ चा अर्थ वाहन ओव्हरटेक करण्यापूर्वी हॉर्न देऊन माहिती देणे. म्हणजेच ट्रकचालकाच्या मागे धावणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवण्यास सांगतात. आधीच्या काळी अनेक ट्रकमध्ये साइड मिरर उपलब्ध नव्हते, त्यामुळे चालकांना मागून येणाऱ्या वाहनांची माहिती मिळायची नाही, यासाठी त्याच्या मागे ‘हॉर्न ओके प्लीज’ हे लिहावं लागत होतं, जेणेकरून ते मागून येणाऱ्या वाहनाला साइड देऊ शकतात, ज्यामुळे अपघात देखील टळू शकतो. आता प्रश्न असा उभा राहातो की हॉर्न देण्यासाठी ‘हॉर्न प्लीज’ हा शब्द वापरला जातो. पण या दोन शब्दांच्या मध्ये ‘ओके’ का लिहिलं जातं? याचा कधी विचार केलाय?

यामागची तशी अनेक कारणं देण्यात आली आहेत, त्यातील एक कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगभरात डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. यादरम्यान रॉकेलने भरलेले कंटेनर ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते, जे अतिशय ज्वलनशील आहे. अपघाताच्या वेळी या ट्रकला वेगाने आग लागायची, त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना योग्य अंतर ठेवा, असे सांगण्यासाठी ‘ऑन केरोसीन’ (On Kerosene) लिहिण्यात आले, ज्याला हळूहळू OK असे म्हणू लागले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या