JOIN US
मराठी बातम्या / Viral / हिरव्या रंगाचा कपडा बांधकाम सुरु असणाऱ्या बिल्डिंगला का लावला जातो?

हिरव्या रंगाचा कपडा बांधकाम सुरु असणाऱ्या बिल्डिंगला का लावला जातो?

या रंगाचा कपडा लावण्यामागे कारण आहे, एवढंच काय तर यामागे एक नाही तर हजारो कारणं आहेत, चला जाणून घेऊया या मागची कारणं.

जाहिरात

सोर्स : गुगल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 फेब्रुवारी : भारतात बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम सुरु आहे. भारत एक डेवलपिंग कन्ट्री असल्यामुळे सहाजिक जागोजागी डेव्लपमेंट होत आहेत. तुमच्या आजुबाजूला देखील तुम्हाला अशा बिल्डिंग पाहायला मिळतील ज्याचं काम सुरु आहे. पण तुम्ही यासोबतच एक गोष्ट पाहिली का? की या कन्स्टक्रशन होत असलेल्या बिल्डिंगला हिरव्या रंगाचा कपडा लावला जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय की हा हिरव्या रंगाचाच का लावला जातो? या रंगाचा कपडा लावण्यामागे कारण आहे, एवढंच काय तर यामागे एक नाही तर हजारो कारणं आहेत, चला जाणून घेऊया या मागची कारणं. हे ही पाहा : प्रेम व्यक्त करण्यासाठी हार्ट ‘या’ चिन्हाचा वापर का होतो? तुम्हाला माहितीय कारण? यामागचं महत्वाचं कारण आहे की संरक्षण संरक्षण- बांधकाम सुरु असताना तिथून धुळ, माती, खडी किंवा इतर गोष्टी बाहेर न पडाव्यात तसेच यामुळे इतर लोकांना त्रास होऊ नये यासाठी हा कपडा लावला जातो. कचरा कमी करण्यात मदत या कापडामुळं बांधकामातील कचरा कमी करण्यात मोठी मदत होते. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? जेव्हा बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु असतं आणि धुळ उडते तेव्हा हा कापडा पाण्याने ओला करतात, ज्यामुळे माती आणि इतर गोष्टी त्याला चिकटून राहातात. ज्यामुळे धुळ पसरत नाही. सूर्यकिरणांपासून बचाव कापडाचा हिरवा रंग हा बांधकामातील वास्तू, तसेच इमारतीला सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवतो. परिणामी त्यात अधिक पाणी शोषलं जातं. बांधकाम पक्कं करण्यासाठी ही बाब अतिशय फायद्याची ठरते. लोकांसाठी सतर्कतेचा इशारा बांधकाम सुरु असणाऱ्या इमारत किंवा ठिकाणहून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना या रंगामुळे सतर्क राहण्याचा इशारा मिळतो आणि ते सावध राहातात. गोपनीयता किंवा प्रायवसी अनेकदा काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये इमारत पूर्ण होऊन ती तयार होईपर्यंत हे हिरवं कापड वापरण्यात येतं. मुळात यामागे गोपनीयता पाळत आपल्या बिल्डिंगच्या डिझाइनमुळे लोकांना थक्कं करणं हा देखील त्या मागचा एक हेतु आहे.

आता प्रश्न असा उभा राहातो की हिरवाच रंग का? तर पांढरा, काळा, निळा अशा कोणत्याही रंगाच्या तुलनेत तुलनेच हिरवा रंग हा बऱ्याच अंतरावरून आपल्या नजरेत येतो. शिवाय सूर्यकिरणं परतवून लावण्यासाठीही तो मदत करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या