जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Valentine Day 2023 : प्रेम व्यक्त करण्यासाठी हार्ट 'या' चिन्हाचा वापर का होतो? तुम्हाला माहितीय कारण?

Valentine Day 2023 : प्रेम व्यक्त करण्यासाठी हार्ट 'या' चिन्हाचा वापर का होतो? तुम्हाला माहितीय कारण?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

प्रेम व्यक्त करण्यासाठी हार्ट चिन्हाचा वापर का केला जातो? शरीरात इतर अवयव असताना हृदयाशी संबंधित हे चिन्ह वापरण्यामागे काय कारण आहे?

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 13 फेब्रुवारी : सध्या तरुणाईचा अत्यंत आवडता व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. उद्या (14 फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन्स डे साजरा होत आहे.प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी तरुण-तरुणी आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचं फूल आणि भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात. या दिवशी मेसेजेसमध्ये, भेटवस्तू, प्रेमपत्र किंवा शुभेच्छा पत्रांवर हार्ट या चिन्हाचा वापर केलेला दिसतो. हार्ट हे चिन्ह प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. पण हे चिन्ह प्रतीक मानण्यामागे नेमकं काय कारण आहे? प्रेम व्यक्त करण्यासाठी हार्ट चिन्हाचा वापर का केला जातो? शरीरात इतर अवयव असताना हृदयाशी संबंधित हे चिन्ह वापरण्यामागे काय कारण आहे? प्रेम करण्यासाठी खरंच हृदयाची गरज असते की मेंदू हे काम करू शकतो, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात कधीनाकधी निर्माण झाले असतील. हे ही पाहा : फिल्मी स्टाईलनं नवरीनं थांबवलं लग्न, मग प्रेमीची एन्ट्री आणि… नक्की काय आहे प्रकरण यासाठी आम्ही `द सबलाइम इंजिन :अ बायोग्राफी ऑफ द ह्यूमन हार्ट` या पु्स्तकाचे लेखक थॉमस आणि स्टीफन अ‍ॅमिडॉन यांच्याकडून हृदय आणि प्रतीकात्मकतेविषयी महत्त्वाच्या बाबी समजून घेतल्या.या बाबी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. `व्हेरमाँट पब्लिक डॉट ओआरजी`ने या विषयीची माहिती दिली आहे. हृदय हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. संपूर्ण शरीरक्रिया हृदयावर अवलंबून असते. प्रेमातदेखील हृदयाला महत्त्वाचं स्थान आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण हार्टचे चिन्ह वापरतो. हे चिन्ह प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. मानवी शरीरात हृदय रक्ताचं पंपिंग करून ते सर्व अवयवांपर्यंत पोहोचवतं. हृदयाचे ठोके दर सेकंदाला पडत असतात. जर तुम्ही वयाच्या 70 वर्षांपर्यंत जगलात तर तुमचं हृदय या कालावधीत सुमारे दोन अब्जवेळा धडधडलेलं असतं.

    News18

    प्रेम व्यक्त करण्यासाठी हार्ट या चिन्हाचा वापर करण्यामागे असलेलं कारण लेखक थॉमस आणि स्टीफन अ‍ॅमिडॉन यांनी सांगितले आहे. ते म्हणतात, प्रेम आणि इतर भावना प्रत्यक्षात मेंदूद्वारे नियंत्रित केल्या जातात. त्यांचा हृदयाशी संबंध नसतो. या भावना नियंत्रित केल्या जाणाऱ्या मेंदूतील भागाला अमिग्डाला म्हणतात. लोक काही प्रमाणात हृदयाला प्रेमासारख्या तीव्र भावनांशी जोडतात कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर एक्साईट होतो तेव्हा आपलं हृदय काहीवेळ वेगाने धडधडतं आणि आपलं लक्ष हृदयाच्या ठोक्यांकडे वेधलं जातं. पण या वेळी आपल्या मेंदूमध्ये काय क्रिया चाललीय याची आपल्याला जाणीव नसते. प्रेम व्यक्त करण्यासाठी हार्ट हे चिन्ह कुठून आलं हे खरोखर कोणालाही माहिती नाही. पण या चिन्हाशी निगडीत काही सिद्धांत आहेत. यापैकी एक सिद्धांत म्हणजे, हार्टचा आकार सिल्फियम नावाच्या नामशेष झालेल्या वनस्पतीच्या पानाच्या आकारातून येतो. ही वनस्पती रोमन लोकांच्या काळात प्रेमाच्या औषधातील मुख्य घटक मानला जात असे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    या चिन्हाशी दुसरा सिद्धांत असा आहे की, सेंट व्हॅलेंटाईनने गुप्तपणे विवाहाची व्यवस्था करण्यासाठी हे चिन्ह वापरलं होतं. तसंच मानवी हृदय कसं दिसतं याचा हे चिन्ह फक्त अंदाज होय. अशा विविध संकल्पना हार्ट या चिन्हाशी निगडीत आहेत. पण वर्षानुवर्ष हार्ट हे चिन्ह प्रेमाचं प्रतीक मानलं जात आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजही या चिन्हाचा वापर केला जात आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात