JOIN US
मराठी बातम्या / Viral / Cricket News : क्रिकेटच्या मैदानावर अनेक पिच का असतात? जर खेळ एका पिचवरच खेळला जातो, मग दुसऱ्याचा काय उपयोग?

Cricket News : क्रिकेटच्या मैदानावर अनेक पिच का असतात? जर खेळ एका पिचवरच खेळला जातो, मग दुसऱ्याचा काय उपयोग?

कधी विचार केलाय का की या मैदानावर एकापेक्षा जास्त पिच का असतात?

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जून : भारतासारख्या देशात क्रिकेट हा केवळ खेळ नसून ती एक आवड आणि भावना आहे. आता WTC सुरु आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचा फायन सामना सुरु आहे. संपूर्ण देशाचं काय तर जगाचं लक्ष या मॅचकडे आहे. कारण जो कोणी ही मॅच जिंकेल तो वर्ड चॅम्पियन खिताब आपल्या नावे करणार आहे. पण क्रिकेटबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. आज आम्ही क्रिकेटशी संबंधीत अशात एका रंजक गोष्टीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ज्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल. तुम्ही पाहिलं असेल की क्रिकेटर जेथे खेळतात किंवा खेळ सुरु आहे. त्याच्या बाजूला देखील दोन किंवा तीन पिच तयार करुन ठेवले जातात. ज्यावर संपूर्ण खेळ खेळला जातो. पण कधी विचार केलाय का की या मैदानावर एकापेक्षा जास्त पिच का असतात? तेल आंदोलनाची धास्ती, WTC Finalसाठी ICCने तयार केल्या दोन खेळपट्ट्या; काय आहे नियम क्रिकेटचं संपूर्ण मैदान हे हिरव्या गवताने भरलेलं असतं पण जिथे बॅटिंग सुरु असते, तो पिच मातीचा बनलेला असतो तिथे गवत नसतं. अशाच प्रकारचे आणखी दोन-तीन पिच बाजूला तयार केले जातात. ज्याचं काम काय किंवा ते कशासाठी केले जातात हे अनेकांना माहिती नसतं. खरंतर क्रिकेटचे मैदान गोल असून त्याच्या मध्यभागी पिच बनवले आहे. मध्यभागी बनवलेलं पिच आंतरराष्ट्रीय खेळांसाठी आहे. आयपीएल किंवा विश्वचषक यांसारख्या स्पर्धांमध्ये अनेक सामने एकाच मैदानावर खेळवले जातात. त्यामुळे पिच खराब होते. सामन्यात व्यत्यय येऊ नये म्हणून मग ती बाजूची खेळपट्टी वापरली जाते. या खेळपट्टीचे आणखी एक कारणही आहे. अनेक वेळा असे देखील घडते की, खेळाडू सामन्यापूर्वी मैदानावर सराव करतात. अशा परिस्थितीत तो मुख्य खेळपट्टीवर सराव करू शकत नाही कारण खेळपट्टी खराब होण्याची भीती असते. म्हणूनच ते लगतच्या खेळपट्टीचा वापर करतात. या खेळपट्ट्यांना सराव खेळपट्ट्या असेही म्हणतात. सामन्याव्यतिरिक्त जेव्हा स्थानिक खेळाडू किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मैदानावर सराव करावा लागतो तेव्हा ते त्याच खेळपट्टीवर येऊन सराव करतात. रणजी ट्रॉफीसारखे राज्यस्तरीय सामने देखील सराव खेळपट्टीवर आयोजित केले जातात आणि या सामन्यांसाठी बाजूच्या खेळपट्टीचाही वापर केला जातो. कधीकधी या बाजूच्या खेळपट्ट्या मैदानाच्या मध्यभागी नसतात, त्यामुळे त्यांचा आंतरराष्ट्रीय खेळांसाठी वापर केला जात नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या