जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / तेल आंदोलनाची धास्ती, WTC Finalसाठी ICCने तयार केल्या दोन खेळपट्ट्या; काय आहे नियम

तेल आंदोलनाची धास्ती, WTC Finalसाठी ICCने तयार केल्या दोन खेळपट्ट्या; काय आहे नियम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन खेळपट्ट्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन खेळपट्ट्या

WTC Final : इंग्लंडच्या ओव्हल मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना होणार आहे. यासाठी आयसीसीने मोठा बदल केला असून दोन खेळपट्ट्या तयार केल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ओव्हल, 07 जून : WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आजपासून सुरू होणार आहे. या सामन्याआधी आता मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना होणार आहे. यासाठी आयसीसीने मोठा बदल केला असून दोन खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. क्रिकबझने दिलेल्या रिपोर्टनुसार, आयसीसीने बॅकअप प्लॅन तयार केला आहे. लंडनमध्ये सध्या तेलासाठी आंदोलन सुरू आहे. यामुळे आंदोलकांकडून खेळपट्टी खराब केली जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. जर असं झाल्यास दुसऱ्या खेळपट्टीवर सामना खेळवला जाईल. आयसीसीने प्लेइंग कंडिशनबाबत नियम जारी केले आहेत. या नियमात दोन खेळपट्ट्यांबाबत कधी आणि कसा सामना खेळला जाऊ शकतो याबाबत सांगण्यात आलंय.

क्रिकेटच्या मैदानावर अनेक पिच का असतात? जर खेळ एका पिचवरच खेळला जातो, मग दुसऱ्याचा काय उपयोग?

6.4.1 - जर मैदानी पंचांनी खेळपट्टी खेळण्यायोग्य नाही असं ठरवलं तर ते खेळ थांबवू शकतात आणि याबाबत आयसीसी मॅच रेफ्रींना याबद्दल कळवतील. 6.4.2 - ऑन फिल्ड पंच आणि आयसीसी मॅच रेफरी दोन्ही संघाच्या कर्णधारांशी चर्चा करतील. 6.4.3 - जर कर्णधारांनी खेळ पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली तर सामना पुन्हा सुरू होऊ शकतो. 6.4.4 - जर खेळ त्या खेळपट्टीवर सुरू झाला नाही तर ऑन फिल्ड पंचांना मॅच रेफरींशी चर्चा करावी लागेल. खेळपट्टी दुरुस्त करता येऊ शकते का? असं केल्यास दोन्ही संघांना समान फायदा होईल का हे पाहिल्यानंतरच सामना खेळवला जाईल. 6.4.5 - खेळपट्टी दुरुस्त करता आली नाही तर रेफरी आयसीसीसोबत चर्चा करून खेळ दुसऱ्या खेळपट्टीवर खेळवण्याचा निर्णय घेतील. आयसीसी दुसऱ्या खेळपट्टीसाठी तयार असेल तरच सामना खेळला जाईल. 6.4.6 - दुसऱ्या खेळपट्टीवर राखीव दिवसासह निश्चित वेळेत सामना न झाल्यास सामना कोणत्याही निकालाशिवाय रद्द केला जाईल. 6.4.7 - या सर्व प्रक्रियेदरम्यान आयसीसी मॅच रेफरींना दोन्ही कर्णधार आणि हेड ऑफ द ग्राउंड यांच्याशी चर्चा करावी लागेल. यानंतर एकत्रित निर्णय घेतला जाईल. लंडनमध्ये जस्ट स्टॉप ऑइल आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात लोकांकडून ब्रिटन सरकारच्या तेल, गॅस आणि कोळसा योजनेचा विरोध करत आहे. सरकारने या योजनांशी संबंधित लायसन्स रद्द करावीत अशी मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात