लग्नातच मेहुणीने केली दाजीची फजिती (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली 23 जून : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतात. लग्नातील मजेशीर व्हिडिओंनाही नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळते. यात कधी नवरदेव-नवरीचा डान्स तर कधी पाहुण्यांची मजेशीर कृत्य किंवा फजिती पाहायला मिळते. आता लग्नातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मेहुणी आणि दाजी यांचं नातं अतिशय वेगळं असतं. या नात्यात मजा, मस्ती आणि मस्करी सुरूच असते. मात्र, आता समोर आलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, की ‘असली मेहुणी नको रे बाबा’. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मेहुणीने असं नेमकं काय केलं. या दाजी आणि मेहुणीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता, की लग्नानंतर मेहुणीने नवरदेवाची अशी अवस्था केली, ती तो कुठे तोंडही दाखवू शकला नाही. अनेक ठिकाणी लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवणीच्या वेळी एक विधी पार पाडला जातो.
विशेषतः उत्तर प्रदेशात हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. या विधीला ‘मुंह दिखाई’ असं म्हटलं जातं. यात नवरीच्या घरच्या काही महिला येतात आणि त्या नवरदेव तसंच त्याच्या सोबत बसलेल्या इतर भावांना आणि दाजींना काहीतरी भेटवस्तू देतात. यासोबतच यात मजा-मस्करीही चालते. मजेत त्या नवरदेव आणि त्याच्यासोबत बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर टिकली-लिपस्टिक लावतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, मेहुणी नवरदेवाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारताना दिसतो. यामुळे त्याचा संपूर्ण चेहरा पांढरा होऊन जातो. मेहुणीने आपल्या दाजीचा चेहरा असा करून टाकला की त्याचं तोंडही तो दाखवू शकला नाही. यासोबतच इतर मेहुण्यांनी नवरदेवाशेजारी बसलेल्या इतर लोकांसोबतही असंच केलं. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 83 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.