लग्नाची अजब प्रथा.
नवी दिल्ली, 23 जानेवारी : लग्न म्हटलं की हळद आलीच. भारताच्या वेगवेगळ्या भागात लग्ना च्या वेगवेगळ्या प्रथा असल्या तरी हळद मात्र लग्नात बहुतेक ठिकाणी लावली जाते. हळदीमुळे नवरीचं सौंदर्य अधिक खुलतं. पण असं एक ठिकाण जिथं नव्या नवरीला हळद लावली जात नाही, तर उलट काळं फासलं जातं. इतकंच नव्हे तर तिला चिखलाने अंघोळ घातली जाते. लग्नाच्या दिवशी आपण सुंदर आणि परफेक्ट दिसावं असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं त्यामुळे ती शक्य असेल तितके प्रयत्न करते. असं असताना एखाद्या नवरीला काळं फासलं जातं, तिच्यावर चिखल फेकला जातो, असं सांगितलं तर साहजिकच कुणालाही धक्का बसेल. ही अशी विचित्र परंपरा नेमकी आहे कुठे, हे जाणून घेण्याची उत्सुकताही तुम्हाला असेल. लग्नाला यायचं हं, पण…; नवरीबाईची अजब अट, पाहुण्यांना जबर धक्का या प्रथेला ब्लॅकनिंग दी ब्राइड म्हणजेच वधूला काळं फासणं असं म्हटलं जातं. काही ठिकाणी नवरदेवासोबतही असं केलं जातं. एबरडीन विद्यापीठातील संशोधनानुसार, ही प्रथा 19 व्या शतकातील आहे, जेव्हा विवाहादरम्यान महिलांचे पाय स्वच्छ करण्यासाठी स्टोव्हची काजळी वापरली जात असे. 20 व्या शतकाच्या शेवटी, ती एक मजेदार विधी बनली ज्यामध्ये वधू आणि वर दोघांवर घाणेरड्या गोष्टी फेकल्या गेल्या. यामध्ये वधू-वरांवर शाई फेकली जाते आणि काजळीही लावली जाते. वधूवर फेकण्यात येणारी घाण, काळी शाई, चिखल, काजळी, अंडी, कुजलेले अन्न, काळा रंग फेकणं शुभ लक्षण मानलं जातं. Weird Tradition : सेल्फी आणि बरंच काही…; इथं मृतदेहांसोबत केल्या जातात विचित्र गोष्टी लग्न गुलाबासारखं सुंदर नसून त्यात अनेक अडचणी येतात आणि दोघांनी मिळून या समस्यांना सामोरं जावं लागतं. असं काळं फासल्याने चिखल फेकल्याने वधू-वर नव्या जीवनात प्रवेश करताना त्याचं वैवाहित जीवन सुखाचं, आनंदाचं जातं, असं हे लोक मानतात.