JOIN US
मराठी बातम्या / Viral / हटके Hairstyle Viral; VIDEO पाहून सांगा कोण कोण करणार बरं?

हटके Hairstyle Viral; VIDEO पाहून सांगा कोण कोण करणार बरं?

तुम्ही अनेक प्रकारच्या हेअरस्टाईल पाहिल्या असतील, पण या व्हिडीओतील हेअरस्टाईल क्वचितच पाहिली असेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जून : फॅशनच्या नावाने लोक काय काय नाही करत. कुणी विचित्र कपडे घालतं तर कुणी अजब हेअरस्टाईल करते. अशाच एका हेअरस्टाईलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अशी हेअरस्टाईल तुम्ही आयुष्यात कधी पाहिली नसेल. व्हिडीओ पाहूनच तुम्ही इतकं हसाल की तुमचं पोट दुखेल पण हसू आवरणार नाही. असे बरेच लोक आहेत जे फॅशन ट्रेंड फॉलो करतात. अशात आता एक हेअरस्टाईल तुफान व्हायरल होते आहे. आता ही हेअरस्टाईल कोण कोण फॉलो करेल, असा प्रश्न पडला आहे. हेअरस्टाईल पाहून प्रत्येकाला धक्का बसला आहे. कारण ही हेअरस्टाईल चक्क बैलाच्या शिंगासारखी आहे. हा काय प्रकार? माणसाच्या पायाला हात; VIRAL PHOTO पाहून सर्वांना धक्का व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुणी खुर्चीवर बसली आहे. तिच्या केसांच्या मध्ये भांग पाडून दोन्ही बाजूने केस वर केले आहेत. जशी बैलाची शिंगे असतात तसे हे केस वाकडे केले आहेत. त्यावर हेअर स्प्रे मारला आहे, जेणेकरून केस तसेच राहतील. महिलेची हेअरस्टाईल पाहताच सर्वात आधी समोर बैलच येतो. be.like.bro नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याला कुणाला अशी हेअरस्टाईल हवी, त्याला टॅग करा, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. PHOTO - तुम्हाला काय वाटतं, कोण आहे हा प्राणी? चेहरा पाहाल तर विश्वास बसणार नाही व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच मजेशीर कमेंज येत आहेत. अनेकांनी तरुणीला म्हैस म्हटलं आहे. एका युझरने दक्षिण आफ्रिकेची पांढरी म्हैस म्हटलं तर एकाने यमराजाची सावत्र बहीण असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या हेअरस्टाईलला काय म्हणाल? अशी हेअरस्टाईल करण्याची तयारी तुमची आहे का? किंवा हा व्हिडीओ तुम्ही कुणाला टॅग कराल? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या