बीजिंग, 25 जून : सामान्यपणे माणसाला दोन हात-दोन पाय असतात. हात कमरेच्या वरच्या बाजूला तर पाय कमरेच्या खालच्या बाजूला असतात. दोन्ही अवयवांचा वापर वेगवेगळा. काही प्रकरणात तुम्ही दोनऐवजी चार हातपायही पाहिले असतील. पण कधी पायाला हात पाहिला आहे का? असाच एक शॉकिंग फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. खरंच असं होऊ शकतं का, हे पाहून लोकांना आश्चर्य वाटतं आहे. चीनमधील ही घटना आहे. पायाला हात हा नैसर्गिक नाही तर हा डॉक्टरांनी केलेला चमत्कार आहे. डॉक्टरांनी एका व्यक्तीची सर्जरी केली आणि त्याचा हात पायाला जोडला. ही शस्त्रक्रियेत झालेली चूक वगैरे नाही तर डॉक्टरांनी मुद्दामहून तसं केलं आहे. या व्यक्तीचा हात त्याच्या पायाला जोडून डॉक्टरांनी त्याला जिवंत ठेवलं. आता हे कसं काय शक्य आहे पाहुयात. Weird Disease : मासिक पाळीत तरुणीच्या डोळ्यातूनही यायचं रक्त; धक्कादायक कारण चिनी कारखान्यातील कामगाराचा डावा हात मशीनने कापला गेला. त्यानंतर डॉक्टरांनी हा डावा हात रुग्णाच्या पायाला जोडला जेणेकरून हाताला पायाच्या धमनीतून रक्तपुरवठा होईल आणि हात जिवंत राहिल. पायाला टाके घातले असता हाताला रक्त पुरवठा होत होता, पण त्याला कोणतीही मज्जातंतू जोडलेली नव्हती, त्यामुळे तो बधीर राहिला होता. पायाबद्दल बोलायचे झाले तर पायाची स्थिती सामान्य होती, पण त्याला जडपणा जाणवत होता. जेव्हा हात ठीक झाला, तेव्हा एक महिन्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करून रुग्णाचा हात पुन्हा होता तिथं जोडला. रुग्णाच्या डाव्या खांद्याला जोडला आणि या शस्त्रक्रियेच्या यशानंतर डॉक्टरांचं कौतुक करण्यात आलं. Human Body Facts : चमत्कारिक आहे तुमची बॉडी; तुम्हालाही माहिती नसतील तुमच्या शरीराबाबत अशा 10 अजब गोष्टी या व्यक्तीने सांगितले की, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याच्या हातामध्ये खूप हालचाल झाली आणि तो हात अनेक अंशांपर्यंत वाकवू शकला. महिनाभर पाय जोडून ठेवल्याने हाताच्या मज्जातंतूची प्रक्रिया कमी झाली होती. त्यामुळे रुग्णाचा हात पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी किमान सहा महिने लागतील, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
In 2013, Doctors kept the hand of Chinese factory worker, Xie Wei, alive by stitching it to his left ankle and "borrowing" a blood supply from arteries in the leg.
— Morbid Knowledge (@Morbidful) June 23, 2023
Following the surgery, the hand itself felt warm, he said, but it was numb since no nerves were connected and only… pic.twitter.com/CO0gjUp2sT
मॉर्बिड नॉलेज या ट्विटर अकाऊंटवर या अजब प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली आहे.