परमजीत कुमार, प्रतिनिधी देवघर , 4 जून : बघता बघता अर्ध वर्ष संपत आलं आणि जून महिना उजाडला. या महिन्यात नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल. या महिन्यातला येणारा आठवडा विद्यार्थी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदारांसाठी कसा असेल पाहूया. वैद्यनाथ धामचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुदगल यांनी या आठवड्यासाठी राशींनुसार सांगितलेलं भविष्य जाणून घेऊया. मेष : या राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात तब्येत जपावी लागेल. पोटदुखी, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतुलित आहार घ्यावा. शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं. या आठवड्यात कोणतंही नवं काम सुरू करू नका, गुंतवणुकीपासूनही दूर राहा. वाहनं जपून चालवा. Investment Tips: ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचं प्लानिंग करताय? होतात हे 5 नुकसानHosroscope वृषभ : या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा धावपळीचा असेल. तब्येतीबाबतही काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. हा आठवडा काही विशेष लाभदायी ठरणार नाही. व्यापार, व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. मिथुन : या राशीच्या वक्तींना या आठवड्यात प्रेमप्रकरणात काही चढ-उतार पाहायला मिळतील. आठवड्याच्या मध्यावर काहीतरी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च होईल. आठवड्याच्या शेवटी दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे. तुम्ही दुसरी नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात असाल. या व्यक्तींनी गुंतवणुकीत गांभीर्याने लक्ष द्यावं. आपल्या सकारात्मक स्वभावाने, जिद्दीने यश मिळवावं. कर्क : या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम असेल. आठवडाभर आपण ऊर्जावान राहाल. व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मन प्रसन्न राहील. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. सिंह : सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही हा आठवडा उत्तम असेल. तुमची थकलेली कामं या आठवड्यात पूर्ण होतील. व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आठवड्याची सुरुवात अतिशय प्रेमळ असणार आहे. आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. कन्या : या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चिंतेचा असेल. तुमचा चीडचडपणा वाढेल. वडिलांच्या संपत्तीबाबत वाद होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा. या आठवड्यात चुकूनही कोणती गुंतवणुक करू नका. या गुंतवणुकीचा आपल्या आर्थिक परिस्थितीवर आणि कुटुंबियांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. तूळ : या आठवड्यात तब्येत बिघडल्याने आपण चिंतेत राहाल. चुकूनही नव्या व्यवसायाची सुरुवात करू नये. नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी करण्यांसाठी हा आठवडा तणावाचा असेल. वृश्चिक : या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असेल. या आठवड्यात आपल्याला नवी जबाबदारी मिळेल आणि आपण ती पार पाडण्यात यशस्वी ठराल. नवा व्यवसाय करू इच्छित असाल, तर या आठवड्यात आपल्याला वडिलांकडून चांगली साथ मिळेल. मात्र काही वाद उद्भवणार नाहीत याची काळीज घ्यावी. धनू : या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम असेल. आपल्याला नवी नोकरी मिळू शकते. मन प्रसन्न राहील, घरातही समाधानाचं वातावरण असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसोबतचे संबंध आणखी चांगले होतील. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. मकर : या राशीच्या व्यक्तींकडून या आठवड्यात अवाक्याबाहेर खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं. आपला प्रवास होऊ शकतो. या आठवड्यात कोणतेही नवे व्यवहार करू नये. कोणालाही उधार पैसे देऊ नये, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. कुंभ : या आठवड्यात आपल्यावर मानसिक ताण येऊ शकतो. अधिक व्यस्त राहणं महागात पडू शकतं. व्यवसायात नुकसान होऊ शकतं. भांडणांपासून दूर राहावं. बोलण्यावर संयम ठेवावा. मीन : या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम असेल. आपण नव्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. आपली तब्येत आपल्याला साथ देईल. जुनी थकलेली कामं पूर्ण होतील. व्यवसायात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे. एकूणच आपलं मन प्रसन्न राहील.