JOIN US
मराठी बातम्या / Viral / थाटामाटात झालं लग्न, पण शेवट धक्कादायक; टॉयलेटमध्ये अशा अवस्थेत सापडली नवरी; VIDEO VIRAL

थाटामाटात झालं लग्न, पण शेवट धक्कादायक; टॉयलेटमध्ये अशा अवस्थेत सापडली नवरी; VIDEO VIRAL

लग्नादिवशी असं काही घडलं की सर्वांनाच धक्का बसला.

जाहिरात

लग्नाचा व्हि़डीओ व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 07 एप्रिल :  लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण खास आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अशाच एका कपलचं लग्न अगदी शानदार झालं. थाटामाटात त्यांचं लग्न झालं. पण लग्नाचा शेवट मात्र धक्कादायक झाला. लग्नादिवशी नवरी बाथरूममध्ये अशा अवस्थेत आढळली की सर्वांनाच धक्का बसला. लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अमेरिकेतील हे लग्न आहे. दक्षिण कॅरोलिनातील मॅकेन्झी ग्रिमस्ले आणि ब्रॅडन या कपलचा लग्नसोहळा झाला. 24 मार्च रोजी त्यांचं लग्न होतं. त्यांच्या लग्नाला त्यांचं कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार सर्व उपस्थित होते. सर्वजण अगदी आनंदात होते. नवरा-नवरीचे आनंदी आणि भावुक क्षणही या लग्नाच्या व्हिडीओत पाहायला मिळाले. लग्न झाल्यानंतर त्यांनी पार्टीत डान्सही केला. नवरा-नवरी दोघंही थिरकले. पण शेवटी असं काही घडलं की पाहुण्यांना धक्का बसला. नवरदेवही हैराण झाला.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मॅकेन्झीने तिच्या लग्नाचा व्हिडीओ टिकटॉक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्यात तिने स्वतः आपल्या लग्नादिवशी आपल्याकडून एक चूक झाल्याचं सांगितलं. VIDEO : नवरा-नवरीला चढला जोश, विमानातच…; प्रवाशांना वाटली लाज, नेटिझन्सही संतप्त लग्नात ती खूप दारू प्यायली. ती इतकी दारू प्यायली की तिची अवस्था बेकार झाली होती. ती फुल्ल टल्ली झाली होती. तिला नीट उभं राहता येत, नव्हतं. स्वत:चा तोलही सांभाळता येत नव्हतं. तिला दारूची नशा इतकी चढली की तिचं असं रूप पाहून लग्नात आलेल्या पाहुण्यांसह नवरदेवही हैराण झाला. दारू पिऊन नवरीबाईने लग्नात अक्षरशः गोंधळ घातला. शेवटी तिने टॉयलेटमध्ये जाऊन उलट्या केल्या. कमोडमध्ये तोंड घालून ती उलट्या करत होती. तिच्या या अशा अवस्थेतही नवरदेवाने तिची साथ सोडली नाही. टॉयलेटमध्ये तोसुद्धा तिच्या सोबत बसलेला होता. VIDEO - नवरदेव वरात घेऊन दारात अन् धावत बाल्कनीत गेली नवरी; पुढे असं काही घडलं की… हे कपल इन्स्टाग्रामवरही लोकप्रिय आहे. या कपलने आपल्या लग्नाचे व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरही पोस्ट केले आहेत. पण नवरीचा दारू पिऊन धिंगाणा करतानाचा हा व्हिडीओ फक्त टिकटॉकवर आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केलेला नाही.

संबंधित बातम्या

लग्नाचा असा एखादा किस्सा तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या