JOIN US
मराठी बातम्या / Viral / Wedding Video : लग्नाच्या मिरवणूकीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर घोड्यांनी धरला ठेका, डान्सने वेधलं लक्ष

Wedding Video : लग्नाच्या मिरवणूकीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर घोड्यांनी धरला ठेका, डान्सने वेधलं लक्ष

लग्नसराईचा हंगाम सुरु असून सध्या अनेक लग्न पार पडताना दिसत आहेत. एवढंच नाही तर लग्नातील निरनिराळे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

जाहिरात

पारंपरिक वाद्यांच्या तालावर घोड्यांनी धरला ठेका

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायचंद शिंदे, जुन्नर, 02 जून : लग्नसराईचा हंगाम सुरु असून सध्या अनेक लग्न पार पडताना दिसत आहेत. एवढंच नाही तर लग्नातील निरनिराळे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. नुकताच समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. लग्नाच्या मिरवणुकीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये पारंपरिक वाद्यांच्या तालावर चक्क घोडेही डान्स करत आहेत. हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधत असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

जुन्नर तालुक्यातील खोडद येथील एक लग्न सोहळा मोठा चर्चेत आला आहे. लग्न सोहळ्यामध्ये आपल्या मुलाच्या लग्नासाठी एका बैलगाडा मालकाने नवरा नवरीची मिरवणूक घोडी वरून काढली. विशेष म्हणजे मिरवणुकीत सहभागी झालेल्या या दोन्ही घोड्यानी पारंपारिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला. मग घोड्यावर बसलेल्या नवरा नवरीने सुद्धा स्वतःला सावरत थेट घोडीवर बसून हात उंचावत हलकासा डान्स सुद्धा केला.

संबंधित बातम्या

व-हाडी मंडळी मात्र या दोनी घोडींच्या अनोख्या डान्स वर आवाक होऊन पाहतच राहिले. आणि मग काय काहींनी थेट या डान्समध्ये सहभाग सुद्धा घेतला. राज्यात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे अशातच वेगवेगळे ट्रेंड लग्नामध्ये पाहायला पाहायला मिळत आहेत. कुठे नवरीची एन्ट्री थेट बुलेटवर तर कुठे लग्नाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचे आयोजन केले जात आहे. अशातच जुन्नर मधील हा लग्न सोहळा घोडी डान्स मूळे चर्चेत आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या