व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 21 जून : जगातील सर्वात धोकादायक रस्ते भारतात आहेत. जिथे वाहन चालवणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. होय… ज्या रस्त्यावरून चालताना आत्मा हादरतो, जिथून कधी कधी बाईक किंवा कार काढण देखील कठीण आहे. तिथून कधी काही बस ड्रायवर प्रवाशांसह दररोज प्रवास करतात. यासंबंधीत अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले देखील असेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो खरोखर हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. बिबट्या दररोज शेतात येऊन करतो काय? शेतकऱ्याने CCTV पाहिला आणि त्याला धक्काच बसला हा व्हिडीओ ‘हिमाचल रोडवेज’चा आहे. इथे ड्रायव्हरचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एका अरुंद रस्त्यावर बस चालवताना दिसला होता, ज्याच्या एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. डोंगराच्या कड्यावर उभी होती तरुणी, तोल गेला आणि… थरारक Video Viral आता असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र यामध्ये चालक बस रस्त्यावर नाही तर खडकांवर चालवून घेऊन जात आहे. ते ही अगदी अरुंद रस्त्यावर. मार्गावर चालवत आहे. हा रस्ता इतका अरुंद आहे की त्यावरुन कार वळवणं देखील कठिण आहे. त्याच रस्त्यावर या ड्रायवरने बस चालवली. फक्त तो रस्ता खडकाळ नाही तर तेथून पाणी देखील वाहत आहे. या व्हिडीओबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कळवा.
हा व्हिडिओ 20 जून रोजी ‘हिमालय क्लब’ (@HimalyanClub) या ट्विटर हँडलने पोस्ट केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले - कठीण रस्ते अनेकदा सुंदर स्थळी घेऊन जातात. ही क्लिप हिमाचल प्रदेशातील असल्याचा दावा त्यांनी केला. ड्रायव्हरचे उत्कृष्ट कौशल्य पाहून अनेकजण त्याचे चाहते झाले आहेत. अनेकांनी या बस ड्रायव्हरचे कौतुक केले आहे.