Viral Video
मुंबई : हल्ली सापांचा सुळसुळाट वाढला आहे. उन्हाळा असल्यामुळे कडक उन सहन न झाल्यामुळे आणि पाण्याच्या शोधात सगळेच प्राणी इकडे तिकडे जात आहेत. त्यात साप सुद्धा सावली आणि थंडजागेसाठी जिकडे जागा मिळेल तिथे जात आहे, अशातच सापासंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.
या व्हिडीओत साप थेट टू-व्हीलरच्या हँडलमध्ये लपून बसला असल्याचं पाहायला मिळालं. नशीबाने या चालकाला हे वेळीच समजलं, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता. अखेर सर्प मित्रांना बोलवून सापाला जीवदान दिलं गेलं. Video : झोपलेल्या वाघाला बघताच स्तब्ध उभे राहिले हरिण, तेवढ्यात वाघ उठला आणि… दौंड शहरामधील पासकलर वस्तीतून हा प्रकार समोर आला. याठिकाणी घराबाहेर लावलेल्या स्कुटीच्या हँडलच्या आत साप बसला होता, स्कुटीमधून कसलातरी आवाज येत असल्याने मालकाने स्कुटीमध्ये नीट पाहिले, तेव्हा त्याला धक्का बसला.
साप स्कुटीच्या हँडलमध्ये बसल्याने ते पाहून दुचाकी मालकाने तात्काळ सर्पमित्र सद्दाम सय्यद आणि उमेश साळवे यांनी घटनास्थळी येऊन धामण जातीच्या सापाला दुचाकी मधून बाहेर काढून जंगलात सोडून दिले. हा साप तसा लहान होता. पण सापाच्या साइजवर जाऊ नका, कारण तो फार लहान असला तरी देखील तो फार विषारी साप आहे.