प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 11 मे : जगभरातीला लोकांना आजा जणूकाही आयफोनची क्रेझच लागली आहे. लोक आयफोनसाठी महिनोंमहिने पैसे गोळा करतात आणि मग ते खरेदी करतात. कधी कधी काही लोक तर आपल्या परिस्थिती नसताना ही सगळे घेतात किंवा ट्रेंड आहे म्हणून आयफोन विकत घेतात. त्यामुळे मग या फोनला स्वत: पेक्षाही जास्त जपतात. पण विचार करा की हा फोन जर कधी हरवला किंवा गटारात पडला तर? विचार करा त्या व्यक्तीची मनस्थिती काय असेल? अलीकडेच एका व्यक्तीसोबत एक विचित्र प्रकार घडला. त्याचा आयफोन हातातून निसटून गटारात पडला आणि त्यानंतर त्याने जे केलं ते, कॅमेऱ्यात कैद झालं. खरंतर या व्यक्तीने स्वतःचे कपडे काढून गटारात उडी घेतली.
बायको प्रियकरासोबत बेडवर असताना कॅमेरा घेऊन पोहोचला नवरा आणि… Video कैद झाला संपूर्ण प्रकार
ही घटना ब्राझीलमधील आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती एका स्थानिक कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. या मैफलीत नृत्याचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमादरम्यान अचानक त्याचा आयफोन हातातून निसटून जवळच्या गटारात पडला. सुरुवातीला फोन कुठे गेला ते त्याला समजले नाही. नंतर फोन थेट गटारात पडल्याचे दिसून आले.
सोर्स : सोशल मीडिया
Google च्या Top Secret Tricks तुम्हाला माहितीयत का?
तो आरडाओरडा करू लागला. एवढेच नाही तर आजूबाजूच्या लोकांना सांगू लागला की त्याचा फोन गटारात पडला असून तो खूप महागडा फोन आहे. त्याने काही लोकांना पैशाचे आमिषही दिले की, जो कोणी त्याचा फोन काढेल त्याला काही पैसे दिले जातील, मात्र गटारात खूप चिखल असल्याने कोणीही तसे करण्यास तयार नव्हते. अखेर त्या व्यक्तीला स्वत: गटारात उतरावे लागले.
सोर्स : सोशल मीडिया
या व्यक्तीचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याने कपडे काढून गटारात उडी घेतल्याचे पाहू शकता. दरम्यान त्याच्या शरीरावर फक्त चिखल दिसत आहे. पण शेवटी त्याचा फोन सापडला ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. पण आता हा फोन सुरु आहे की नाही, हे मात्र कळू शकलेलं नाही.