राफ्टिंग गाईड आणि पर्यटकांमध्ये जोरदार हाणामारी
नवी दिल्ली 22 मे : ऋषिकेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राफ्टिंग गाईड आणि पर्यटकांमध्ये पॅडल घेऊन जोरदार भांडण होत आहे. वादाचं कारण होतं, गो प्रो कॅमेरा. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ब्रह्मपुरीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये राफ्टिंग गाइड आणि पर्यटक एकमेकांवर पॅडल मारताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, लोक एका राफ्टिंग गाईडवर पॅडलने जोरदार हल्ला करताना दिसत आहेत. दरम्यान, आपला जीव वाचवण्यासाठी तरुणाला काहीच सूचलं नाही आणि त्याने कोणताही विचार न करता थेट गंगेत उडी घेतली. दरम्यान इतर राफ्टर्स त्याला मदत करतात आणि त्याला त्यांच्या राफ्टमध्ये ओढतात. शेकडो फूट उंच इमारतीवरुन तरुण घेत होता उडी; दुसऱ्या इमारतीच्या छतावर पोहोचण्याआधीच काय झालं पाहा..Video हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र या भांडणाबाबत पर्यटन विभागाचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. या प्रकरणाशी संबंधित कोणतीही तक्रार आपल्याकडे आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, वादाचं खरं मूळ गो प्रो कॅमेरा आहे. या कॅमेर्याने पर्यटक गंगेच्या लाटा आणि त्यातील अॅडव्हेंचर शूट करतात. त्याबदल्यात गाईड पर्यटकांकडून मनमानी पैसे घेतात. या भांडणाचं कारणही तोच गो प्रो कॅमेरा असल्याचं बोललं जात आहे.
गंगा रिव्हर राफ्टिंग रोटेशन कमिटीचे अध्यक्ष दिनेश भट्ट या घटनेवर म्हणाले की, पर्यटक आणि गाईड यांच्यात हाणामारी होत असेल तर पर्यटन विभागाने त्यावर कारवाई करावी. याशिवाय याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.