जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शेकडो फूट उंच इमारतीवरुन तरुण घेत होता उडी; दुसऱ्या इमारतीच्या छतावर पोहोचण्याआधीच काय झालं पाहा..Video

शेकडो फूट उंच इमारतीवरुन तरुण घेत होता उडी; दुसऱ्या इमारतीच्या छतावर पोहोचण्याआधीच काय झालं पाहा..Video

एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी

एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी

व्हायरल क्लिपमध्ये स्टंटमॅन ज्या पद्धतीने दोन उंच इमारतींमध्ये उडी मारतो, ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 मे : सोशल मीडियाची क्रेझ अशी आहे, की प्रत्येकाला त्याच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय व्हायचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा. सध्या अशाच काही स्टंट व्हिडिओंनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे, जे पाहून इंटरनेट वापरकर्ते थक्क झाले आहेत. एक छोटीशी चूक आणि मुलगा शेकडो फूट खाली पडला असता. अनेक युजर्सनी असे धोकादायक स्टंट करू नका, असं आवाहनही केलं आहे. व्हायरल क्लिपमध्ये स्टंटमॅन ज्या पद्धतीने दोन उंच इमारतींमध्ये उडी मारतो, ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे दोन इमारतींमधील अंतर खूपच जास्त आहे. यानंतरही तो मुलगा हे अंतर सहज पार करतो. मात्र, क्षणभर तुम्हालाही तो तरुण पडतो की काय, असं वाटेल. पण तो एका इमारतीवरुन उडी घेत दुसऱ्या इमारतीवर पोहोचतो. व्हिडिओमध्ये, मुलगा एका इमारतीच्या छतावरून धावताना आणि दुसऱ्या इमारतीच्या छतावर उडी मारताना दिसत आहे.

जाहिरात

इंस्टाग्रामवर @parkour_tribe नावाच्या अकाऊंटवरुन या मुलाचा थरकाप उडवणारा स्टंट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 16 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, मात्र कमेंट सेक्शनमध्ये बहुतांश युजर्सनी एकच प्रश्न विचारला आहे की, लोकांना जीव धोक्यात घालून काय मिळतं. काही लोकांनी असे धोकादायक स्टंट करू नका, असे आवाहनही केले आहे. हरणाच्या शिकारीसाठी वाघाची धडपड; पाण्यातही उतरला पण हाती आला ‘भोपळा’, हा VIDEO पाहाच एका यूजरने लिहिलं, माझा श्वास रोखला गेला. स्लो मोशन मध्ये पाहिल्यावर खाली पडेल असं वाटत होतं. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट केली आहे की, काही लोक जीवाशी खेळण्याचाही आनंद घेतात. आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, या प्रकारच्या व्हिडिओवर बंदी घातली पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात