केरळ, 11 ऑक्टोबर : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातातील काम गेलं. सोशल मीडिया अशांना मदत मिळवून देत आहे. नेटकरी एकत्र येत अशा गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. वृद्ध पती-पत्नी आपला संसार चालवण्यासाठी अनेक वर्षांपासून दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये ‘बाबा का ढाबा’ नावाने दुकान चालवितात. काही दिवसांपूर्वी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अशातच आता केरळमधील एका आजीचा व्हिडीओ समोर आला आहे. कोरोनाव्हायरलमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे या माऊलीचं दुकान चालेनासं झालं. आता रोजचं पोट कसं भरायचं हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला आहे. यावेळी अभिनेत्री रिचा चड्डा हीनेदेखील या महिलेच्या मदतीसाठी आवाहन केलं आहे.
हे ही वाचा- कमाल! आता ‘बाबा का ढाबा’ची होणार होम डिलिव्हरी, viral videoनंतर Zomatoवर लिस्टेट केरळमधील पार्वती अम्मा एका पत्रकाराने केरळमधील पार्वती अम्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. घर चालवण्यासाठी पार्वती अम्मा केरळमध्ये एक ढाबा चालवते. मात्र कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे तिच्या हातचं काम गेलं व तिच्यावर उपासमारीची वेळ आली. दिल्लीतील बाबा का ढाबा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता केरळमधील नागरिक अम्माच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
या व्हिडीओमधील कॅप्शननुसार पार्वती अम्मा केरळमधील करींबा येथे ढाबा चालवते. हा ढाबा चालवून ती स्वत:चं आणि घरातील सदस्यांचं पोट भरते. मात्र कोरोनाच्या महासाथीनंतर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामध्ये अम्माचा ढाबाही बंद झाला. आता तर हाताला काम नसल्यामुळे तिच्यावर संकट ओढवलं असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी तिच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.