JOIN US
मराठी बातम्या / Viral / Weird food trend : मार्केटमध्ये आली 'पावभाजी आईस्क्रीम'; Video पाहून डोक्याला लावाल हात

Weird food trend : मार्केटमध्ये आली 'पावभाजी आईस्क्रीम'; Video पाहून डोक्याला लावाल हात

गेल्या काही दिवसांपासून तर सोशल मीडियावर फूड ट्रेंड जरा जास्तच चर्चेत आहे. विक्रेते खाण्याच्या वेगवेगळ्या गोष्टींचं फ्युजन करत नवा पदार्थ बनवत आहेत. नुकताच पावभाजीचा नवा प्रकार मार्केटमध्ये आला आहे.

जाहिरात

फूड फ्युजन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 जून : आजचं जग इंटरनेटचं जग आहे. रोज काहीतरी नवा ट्रेंड येतो आणि सोशल मीडियावर त्याची क्रेझ पसरते. रोज काहीतरी नवा विषय, नवं गाणं, नवा डान्स ट्रेंड, फूड ट्रेंड पहायला मिळतो. गेल्या काही दिवसांपासून तर सोशल मीडियावर फूड ट्रेंड जरा जास्तच चर्चेत आहे. विक्रेते खाण्याच्या वेगवेगळ्या गोष्टींचं फ्युजन करत नवा पदार्थ बनवत आहेत. नुकताच पावभाजीचा नवा प्रकार मार्केटमध्ये आला आहे. याचीच चर्चा इंटरनेटवर रंगली आहे. नुकताच समोर आलेला फूड फ्युजनचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. यामध्ये फूड फ्युजनमध्ये चक्क पावभाजी आणि आईस्क्रीमला एकत्र केलं आहे. हे ऐकूनच विचित्र वाटतंय. पण विक्रेत्याने हे फ्जुजन कसं बनवलं हेदेखील तुम्हाला पहायला मिळणार आहे. याचा व्हिडीओ समोर आलाय.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला एक व्यक्ती आईस्क्रीम मेकरमध्ये पाव, भाजी, कांदे आणि चटणी टाकताना दिसत आहे. मग ते क्रीममध्ये मिसळून त्यातून एक आइस्क्रीम बनवतात. सर्वांना एकत्र करुन त्याचा आईस्क्रीम रेल बनवतात. वरुन कांदा, ढोबळी मिर्ची, भाजी घालून सजवतात. @cravingseverytime नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी पोस्टवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. काहींना या फ्युजन वर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून अजु्नही कमेंट येत आहेत. दरम्यान, असे फूड फ्युजनचे व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. यापूर्वीही अनेक फूड फ्युजन व्हिडीओ समोर आले आहेत. काहींना पाहून तर उलटी येईल असे व्हिडीओही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे फूड फ्युजन हा एका नवा ट्रेंडच झाल्या असल्याचं म्हणायला हरकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या