फळांचा फ्युजन चहा, पाहा Video
जगभरात चहाप्रेमींची काही कमतरता नाही.
अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवटही चहापासून होतो.
त्यामुळे अनेक जण चहा हा एक नशाच असल्याचं म्हणतात.
आजकाल तर चहामध्येही नवनवीन व्हरायटी पहायला मिळत आहे.
विक्रेते वेगळ्या आणि हटके प्रकारच्या चहा बाजारात आणत आहेत.
अशातच एक व्यक्ती चहामध्ये फळे मिसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये दिसतंय की, विक्रेत्याने चहामध्ये केळ, सफरचंद, चिकू टाकला.
लोक जेवणात वेगवेगळे प्रयोग करत राहतात तसा चहावाल्यानेही हा प्रयोग करुन बघितल्याचं पहायला मिळतंय.
सध्या हा फळ फ्युजन चहा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.