सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतले मुलीचे हावभाव पाहिले तर कोणीही तिच्यावर इम्प्रेस होईल. याचमुळे कदाचित बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांनीही तिचं भरभरून कौतुक केलं आहे. बिग बी यांनी हा व्हिडीओ री-ट्वीट केला. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. महानायक टीव्ही आणि सिनेमांप्रमाणे सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. ते सोशल मीडियावर आपले विचार, कविता, फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करतात. या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी पंजाबी गाणं सुंदर हावभावांनी म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना बिग बी यांनी लिहिले की, ‘वाह क्या बात है..’ इथे पाहा व्हिडीओ.
विशेष म्हणजे काही वेळापूर्वीच शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला 13 हजाराहून अधिक लाइक मिळाले आहेत. अमिताभ बच्चन यांनी व्हिडओ लाइक आणि शेअर करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला होता. यात एक व्यक्ती कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. या गोष्टींशिवाय अपूर्ण आहे धनत्रयोदशीची पूजा, वाचा पूजेच्या सामानाची यादी वेळीच व्हा सावध! या सवयीकडे दुर्लक्ष केलं तर गुडघे होऊ शकतात निकामी! दिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन! मेहंदी लावण्यापूर्वी त्यात मिसळा या 4 गोष्टी, पांढरे होणार नाहीत केस!