JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'ए बाई! काय चाललंय तुझं' उर्फीने संपूर्ण कपडे घातले, तरी देखील नेटकऱ्यांकडून ट्रोल

'ए बाई! काय चाललंय तुझं' उर्फीने संपूर्ण कपडे घातले, तरी देखील नेटकऱ्यांकडून ट्रोल

उर्फी तिच्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे नेहमीच ट्रोल होत आली आहे. पण असं असलं तरी तिचे फॅन काही कमी नाही.

जाहिरात

व्हायरल फोटो. सोर्स : Instagram

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : उर्फी जावेद नुसतं नाव घेतलं तरी आता लोकांच्या ओळखीचं झालंय, लोक लगोच तिच्या विचित्र कपड्यांच्या स्टाईलबद्दल बोलू लागतात. ती काहीही घलते, असं लोकांचं पहिलं वाक्य असतं. पण काहीही असलं तरी तिने फॅशनच्या दुनियेत आपली जागा कायम केली आहे. तिने तिच्या अशा विचित्र स्टाईलमुळे आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. ती जे काही कपडे घालते त्यामध्ये तिचा कॉन्फिडन्स हा वेगळ्याच लेवलला असतो.

उर्फी तिच्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे नेहमीच ट्रोल होत आली आहे. पण असं असलं तरी तिचे फॅन काही कमी नाही. तिचे फॅन्स तिला नेहमीच सपोर्ट करत आले आहेत, त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांकडे उर्फी फारसं लक्ष देत नाही आणि लक्ष दिलंच, तर कडाडून उत्तर द्यायला उर्फी मागेपुढे कधीच पाहात नाही.

उर्फीला नेहमी ती अंग दाखवते म्हणून लोक म्हणतात, पण यावेळी मात्र उर्फीने पूर्ण कपडे घातले आहेत, तरी देखील ती ट्रोल होत आहे. यामागचं कारण देखील तसंच आहे. तिने पूर्ण कपडे घातले असेल तरी ड्रेसवर असलेली प्रिंट मात्र सगळ्यांना तिला ट्रोल करायला भाग पाडत आहे.

काळ्या रंगाच्या फूल स्लिव वनपिसमध्ये उर्फी सुंदर दिसतेय, पण या वन पिसच्या वरच्या बाजूला छातीजवळ मात्र स्तनाचे फोटो असलेली प्रिंट आहे. जी पाहाताना फारच ऑक्वड वाटत आहे. ज्यामुळे संपूर्ण अंग उर्फीनं झाकलं तरी देखील ती ट्रोल होत आहे. Viral Video : देशाची लाज घालवणारं तरुणींचं कृत्य, हातात सिगरेट घेत उडवली राष्ट्रगीताची खिल्ली आणि… उर्फीचे या ड्रेसमधील फोटो आणि व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागले आहे. नेटीझन्स देखील तिच्या या फोटोंना भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या