सावळ्या रंगावर कोणत्या रंगाचे कपडे उठून दिसतात?

रंग मॅच करण्याची एक कला आहे आणि अनेक रंग वेगवेगळ्या रंगाशी मॅच केल्याने ते रंग खुलुन दिसतात.

त्यात प्रत्येक माणसाच्या शरीराचा देखील वेगळा असा रंग असतो, त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना वेगळा रंग सुट होतो किंवा उठून दिसतो असं आपण म्हणू शकतो.

त्यात गोऱ्या लोकांना सगळे रंग सुट होतात असं म्हणतात, पण मग सावळ्या लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की माझ्यावर काही रंग सुट होत नाहीत.

तर काळजी करु नका आम्ही असे काही कॉम्बिनेशन आणि शेड सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही एकदम क्लासी दिसू शकता. तसेच यामुळे कॉन्फिडन्स सुद्धा तुमचा वाढेल

जास्त करून हलक्या फिकट रंगाचे कपडे चांगले दिसतात, ज्याला Muted Color असं देखील म्हणतात

1 लाल

2 करडा / हलका काळा / राखाडी

3 फिकट निळा, यामध्ये बरेच शेड उपलब्ध आहेत.

4 पांढरा

5 फिकट स्किन कलर / क्रीम कलर

6 फिकट गुलाबी पण त्यातही काहीच शेड

7 फिकट हिरवा

8 काळा रंग हा असा रंग आहे जो सगळ्याच लोकांवर छान दिसतो

हे सगळे रंग पँट शर्ट मॅचींग करून घातले की खूप चांगले दिसतात