मुंबई, 05 ऑक्टोबर : लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात वैवाहिक जोडीदाराबद्दलच्या कल्पना रंगवत असतो पण या कल्पना रंगवण्यात भारतीय लोकांचा हात कोणी धरू शकत नाही. रोजचा सकाळचा पेपर वाचला तर जोडीदाराबद्दल अजब अपेक्षा ठेवणाऱ्या लग्नासंबंधी जाहिराती वाचायला मिळतील. आपल्या देशातील पितृसत्ताक समाजामध्ये स्त्रियांना पत्नी म्हणून स्वीकारण्याआधी पुरुषाच्या विविध मागण्या असतात. त्यातच आता भर पडली आहे एका उच्च-भ्रू बंगाली वकिलाची लग्नाच्या जाहिरातीतील अजब मागणीची. चॅटर्जी नावाच्या या माणसानी आपल्याला लग्नासाठी वधू हवी आहे अशी जाहिरात दिली आहे. यामध्ये नेहमी संस्कारी पत्नीच्या असणाऱ्या मागण्या म्हणजे वधु ही ‘, सुंदर, उंच, सडपातळ, देखणी असावी अशा आहेत पण यामध्ये एक वेगळीच मागणी लक्षात आली ती म्हणजे , पत्नी ही सोशल मीडिया अडिक्ट नसावी म्हणजे सोशल मीडियाचा जास्त वापर करणारी नसावी.
आय.ए.एस. अधिकारी नितीन सांगवान यांनी या जाहिरातीचे फोटो त्यांच्या Twitter वर शेअर केला आहे. ते यावर म्हणतात की, “भावी वर / वधूंनी लक्ष द्या. लग्न करण्याचे निकष बदलत आहेत.” त्याचे हे ट्वीट व्हायरल झाले आहे आणि यावर नेटिझन्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत काही नेटिझन्सच्या मते ही काळाची गरज आहेत तर काही जण याला एका मजेशीर विनोदासारखे बघत आहेत. लैंगिकता, उच्चवर्णीयता, जातीवादनी भरलेल्या ह्या लग्नाच्या जाहिरातीतील उथळ मागण्यांवर काही नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली जाहिरात बीडीएसच्या डॉ. अभिनो कुमार यांची आहे. त्याच्याकडे लग्नाच्या पत्नीसाठीच्या अपेक्षांची भली मोठी यादी आहे जरी ते स्वत: बेरोजगार असले तरी त्यांना झारखंड किंवा बिहारमध्ये काम करणारी भारतीय हिंदू ब्राह्मण मुलगी" हवी आहे इतकेच नाही. तर वधु ही गोरी आणि सुंदर ही असावी आणि ती मूल वाढवण्यात तज्ज्ञ असणे आवश्यक आहे.अशी जगावेगळी अपेक्षा त्याच्या भावी पत्नी कडून आहेत.